ETV Bharat / entertainment

T-Series Bhushan Kumar Rape Case : टी-सीरीजचे एमडी भूषण कुमार बलात्कार प्रकरण; कोर्टाने पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट फेटाळला - पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट फेटाळला

मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ( magistrate court in Mumbai ) टी-सीरीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार ( T-Series MD Bhushan Kumar ) बलात्काराच्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट फेटाळला.

Bhushan Kumar
Bhushan Kumar
author img

By

Published : Apr 19, 2022, 5:38 PM IST

मुंबई : मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ( magistrate court in Mumbai ) टी-सीरीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार ( T-Series MD Bhushan Kumar ) बलात्काराच्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट फेटाळला. आणि तपासादरम्यान विविध कायदेशीर पैलूंशी तडजोड करण्यात आली असेही नमूद केले आहे.

भूषण कुमार यांच्यावर टी-सीरिज या कंपनीत काम करण्याचे आमिष देत ३० वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेने भूषण कुमार यांच्यावर हे गंभीर आरोप केले होते. आरोपानुसार, भूषण कुमार यांनी काम देण्याच्या नावाखाली २०१७ ते ऑगस्ट २०२० (३ वर्षे) पर्यंत महिलेवर अत्याचार केले आहेत.

चौकशी करण्याचे दिले निर्देश

तक्रारदार महिलेने अंतिम अहवालाचे समर्थन करत याचिकाकर्त्यांसाठी कायद्यातील तरतुदींचा गैरवापर केला आहे. हे लक्षात येताच न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाची कायद्यानुसार चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने पोलिसांनी दिलेला रिपोर्ट फेटाळला आहे.

काय आहे बी सारांश अहवाल

बी सारांश अहवालात पोलीस केस खोटे म्हणून केसची वर्गवारी करतात. यात आरोपीविरुद्ध कोणताही पुरावा नसतो. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आरआर खान यांनी महिन्याच्या सुरुवातीला सारांश अहवाल नाकारला होता. आणि त्याचा तपशीलवार आदेश सोमवारी देण्यात आला. नोटीस मिळाल्यानंतर महिलेने कोर्टासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात नमूद केले की, ती अभिनेत्री आहे. आणि गैरसमजामुळे भूषण कुमार यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेत आहे.

हेही वाचा - शेफ तरला दलाल यांच्या बायोपिकमध्ये झळकणार हुमा कुरेशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.