ETV Bharat / entertainment

Ragneeti Wedding : परिणीतीला सानियानं दिल्या हटके स्टाईल लग्नाच्या शुभेच्छा; पाहा व्हिडिओ - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

Ragneeti Wedding : अभिनेत्री परिणीती चोप्रा आज 'आप'चे नेते राघव चड्ढांसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. याआधी तिला तिची बेस्टी आणि माजी टेनिस स्टार सानिया मिर्झानं लग्नासाठी हटके अंदाजात शुभेच्छा पाठवल्या आहेत.

Ragneeti Wedding
Ragneeti Wedding
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 12:15 PM IST

Updated : Sep 24, 2023, 1:15 PM IST

मुंबई Ragneeti Wedding : अभिनेत्री परिणीती चोप्रा आज उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये आप नेते राघव चड्ढा यांच्यासोबत सात फेरे घेणार आहे. हळदी आणि संगीत समारंभानंतर अभिनेत्रीची आज संध्याकाळी विदाई होणार आहे. या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मनोरंजन आणि राजकारणातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती लीला पॅलेस येथे पोहोचल्या असून, तिथं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. दरम्यान, माजी टेनिस स्टार सानिया मिर्झाही या लग्नाला उपस्थित राहणार असल्याची बातमी समोर आलीय. अशातच आता सानिया मिर्झानं तिची बेस्टी परिणीती चोप्राला तिच्या लग्नासाठी शुभेच्छा पाठवल्या आहेत. पण, सानिया तिच्या बेस्टीच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी उदयपूरला जाणार की नाही अशी अटकळ बांधली जात आहे.

सानिया मिर्झा लग्नाला जाणार : सानिया मिर्झानं 23 सप्टेंबरच्या रात्री तिच्या इंस्टाग्रामवर तिची बेस्टी परिणीतीसोबतचा एक फोटो शेअर केलाय. ज्यामध्ये परिणीतीनं तिला घट्ट पकडलं आहे. हा फोटो शेअर करत सानिया मिर्झाने लिहिलं की, सुंदर मुलीचं अभिनंदन. आज संध्याकाळी ७ वाजण्यापूर्वी परिणीती कायमस्वरूपी राघव चड्ढांची होणार आहे.

राजकीय नेतेही राहणार उपस्थित : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नासाठी दोन राज्यांचे मुख्यमंत्री उदयपूरमध्ये दाखल झालेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल परिणीती-राघव यांच्या लग्नासाठी उदयपूरला गेले आहेत. त्यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेदेखील परिणीती-राघवच्या लग्नासाठी उदयपूरमध्ये गेले आहेत. यांच्याव्यतिरिक्त अनेक राजकीय मंडळी परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. अरविंद केजरीवाल परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यालाही गेले होते.

परिणीती-राघवच्या लग्नात कसे असतील कार्यक्रम :

दुपारी 1 - सेहराबंदी

दुपारी 2 - वरात

दुपारी 3.30 - जयमाला

दुपारी 4 - फेरे

संध्याकाळी 6.30- परिणीती चोप्राची विदाई

रात्री 8.30 - शाही डिनर

हेही वाचा :

  1. Parineeti Raghav Chadha wedding: रागनिती विवाहाला चुरा समारंभाने सुरुवात, ९० च्या दशाकतील संगीतात रंगणार संध्याकाळ
  2. Priyanka Chopra to skip wedding : 'रागनिती' विवाहाला प्रियांका चोप्राची दांडी, परिणीती राघवला इन्स्टावरुन दिल्या लग्नाच्या सदिच्छा
  3. RagNeeti wedding: ९० च्या दशकातील थीमसह पार पडणार 'रागनिती' विवाह सोहळा
Last Updated : Sep 24, 2023, 1:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.