ETV Bharat / entertainment

Blind teaser : सोनम कपूरच्या पुनरागमनाचा चित्रपट ब्लाइंडचा टीझर लॉन्च - movie Blind teaser launch

अभि्नेत्री सोनम कपूरच्या पुनरागमनाचा ब्लाइंड चित्रपटाचा टीझर अखेर रिलीज झाला आहे. अत्यंत कमी वेळे प्रेक्षकांना चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवण्यात टीझर यशस्वी झाल्याचे दिसून येते. ब्लाइंड चित्रपटातून सोनम ओटीटीवर पदार्पण करत आहे.

Blind teaser
ब्लाईंड टिझर
author img

By

Published : Jun 27, 2023, 4:32 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर फार काळापासून रूपेरी पडद्यावर झळकलेली नाही. आजवर सोनमने अनेक बॉलिवूड चित्रपटामध्ये काम केले आहे. आता पुन्हा एकदा ती ब्लाइंड या चित्रपटातून पुन्हा मनोरंजन करण्यासाठी परतली आहे. जिओ सिनेमा निर्मित ब्लाईंड या चित्रपटाचा पहिला थरारक टीझर अखेर रिलीज करण्यात आलाय. ब्लाइंड चित्रपटातून सोनम ओटीटीवर पदार्पण करत आहे.

टीझरमध्ये सोनम अंध व्यक्तीच्या भूमिकेत दिसत आहे. रसत्याच्या कडेला बसच्या प्रतीक्षेत असलेल्या सोनमसमोर एक कार थांबते. तिला लिफ्ट दिली जाते. लिफ्ट देणारा तिला दयाळू वाटायला लागतो, परंतु काही वेळानंतर तिला विचीत्र अनुभवाला सामोरे जावे लागते. या टीझरमध्ये तिचे शोषण होतानाही पुढे दाखवण्यात आलंय. यानंतर झाल्या प्रकाराबद्दल ती तक्रार करतानाही दिसते. चित्रपटाचे कथानक याहुन अधिक उलगडत नाही. परंतु चित्रपटाबद्दलची उत्सुकता निर्माण करण्यात हा टीझर निश्चितपणे यशस्वी झालाय असे म्हणावे लागेल.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

ब्लाइंड हा शोम मखिजा दिग्दर्शित आणि सुजॉय घोष, अविशेक घोष, ह्यूनवू थॉमस किम, सचिन नहार, पिंकेश नहार आणि मनीष डब्ल्यू निर्मित आगामी थ्रिलर चित्रपट जिओ सिनेमावर ७ जुलैपासून स्ट्रिमिंग होणार आहे. या चित्रपटात सोनम कपूर मुख्य भूमिकेत असून पूरब कोहली, विनय पाठक आणि लिलेट दुबे हे कलाकार सहाय्यक भूमिकेत आहेत. ब्लाइंड या कोरियन चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटाचे शुटिग ग्लासगो, स्कॉटलंड याते पार पडले आहे.

मधल्या काळात सोनम कपूर सिनेमापासून दूर जाण्याचे एक महत्त्वाचे कारण होते ते म्हणजे तिची प्रग्नंसी. गेल्या वर्षी २० ऑगस्ट रोजी तिने सर्व चाहत्यांना गुड न्यूज शेअर करुन आनंद व्यक्त केला होता. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते. त्यांच्या घरात नवीन सदस्य आल्याने सोनमचे आयुष्य बदलले. या आनंदाच्या बातमीने संपूर्ण आहुजा आणि कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आणि अनिल कपूर कुटुंबावर बॉलिवूडमधून अभिनंदनाचा वर्षावदेखील झाला होता.

हेही वाचा -

१. Sonnalli Seygall : 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सहेगलने सोशल मीडियावर शेअर केले हनिमूनचे फोटो

२. Satyaprem Ki Katha Day 1: सत्यप्रेम की कथाची पहिल्या दिवशीचा कमाई अंदाज आणि स्क्रीन संख्या जाणून घ्या

३. Neena Gupta First On Screen Kiss: नीना गुप्ताने सांगितला पहिल्या ऑनस्क्रीन चुंबनाचा थरारक अनुभव, वाचा सीननंतर काय घडले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.