मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने होस्ट केलेला रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटी 2 हा आज रात्री सीझनच्या दुसऱ्या इव्हॅक्शनचा साक्षीदार होणार आहे. वीकेंड स्पेशल एपिसोडमध्ये, सलमान हा स्पर्धकांना घरातून बाहेर पडणारा पहिला कोण असेल याचा अंदाज घेण्यास सांगताना दिसेल. सध्याला बेबिका ध्रुवे, जिया शंकर आणि माजी फ्लेम्स पलक पुरस्वानी आणि अविनाश सचदेव हे स्पर्धक ज्यांना घरातून बाहेर काढण्याची भीती आहे.
सलमानने स्पर्धकांसोबत एलिमिनेशनबद्दल केले संभाषण : आज रात्री प्रसारित होणाऱ्या एपिसोडमध्ये सलमान स्पर्धकांसोबत एलिमिनेशनबद्दल संभाषण करताना दिसणार आहे. बिग बॉस ओटीटी 2 च्या नवीनतम प्रोमोमध्ये, सलमान स्पर्धकांना विचारताना दिसत आहे की, 'एक अंदाज ले लो कौन जा रहा है आज घर के बहार (आज घरातून कोण निघणार आहे याचा अंदाज लावा).' सलमानच्या सूचनेनुसार, मनीषा राणीने शेअर केले की तिला वाटते की, पलक पुरस्वानी किंवा जिया शंकर यांना शोमधून बाहेर काढले जाऊ शकते. त्यानंतर सलमानने बेबीका धुर्वेला अंदाज विचारला तेव्हा ती जिया शंकर आणि अविनाश सचदेव यांची नावे घेते. विशेष म्हणजे, कोणताही अंदाज बरोबर नव्हता असे सलमान मनीषा आणि बेबिकाला सांगताना दिसत आहे. जे स्पर्धक शोममधून जाणार आहे असे उघड करण्याच्या पूर्वी प्रोमो हा समाप्त झाला आहे. म्हणजे शोमधून कोण जाणार हे आता देखील गुलदस्तात आहे.
सलमान खानने दिला इशारा : सलमानने एक इशारा दिला की आज रात्री एक महिला स्पर्धक बिग बॉस ओटीटी 2 घर सोडणार आहे. याचा अर्थ अविनाश, जिया आणि पलक बेदखल होण्यापासून सुरक्षित आहेत तर बेबीकाला घरातून बाहेर काढले जाऊ शकते. यावर अंदाज लावण्यात येत आहे. पुनीत शर्मा, ज्याला पुनीत सुपरस्टार म्हणूनही ओळखले जाते, याला 24 तासांच्या आत शोमधून बाहेर काढले होते. पुनीतच्या घरातील विचित्र कृत्यांमुळे त्याला 24 तासांपेक्षा कमी कालावधीत बाहेर काढण्यात आले जे शोच्या इतिहासात प्रथमच झाले आहे. बिग बॉस ओटीटी 2च्या घरातून कोण बाहेर पडणार यावर आताही गृप्तता आहे.
हेही वाचा :