मुंबई - BB 17 Promo : बिग बॉसचा सीझन 17 हा प्रेक्षकांना भरपूर मनोरंजनाचा डोस देत आहे. हा शो होस्ट करणारा अभिनेता सलमान खान देखील त्याच्या आगामी 'टायगर 3'मुळे चर्चेत आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3' चित्रपट दिवाळीच्या दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान कतरिना कैफ, बिग बॉस सीझन 17 च्या 'वीकेंड का वार' दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये सलमान खानसोबत 'टायगर 3'चे प्रमोशन करताना दिसणार आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांनी एक प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये कॅट आणि भाईजान एकत्र दिसत आहे.
कतरिना कैफ बिग बॉस 17 मध्ये लावणार हजेरी : कलर्स टीव्हीनं मायक्रोब्लॉगिंग साइट एक्सवर 'बिग बॉस 17'च्या दिवाळी थीमवर लिहलं, 'स्टेज चमकदार ताऱ्यांनी सजवले जाईल. तुम्ही बिग बॉसच्या दिवाळी पार्टीसाठी तयार आहात का?' प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणतो की, यावेळी आपण एकत्र दिवाळी साजरी करू. दिवाळीची संध्याकाळ उजळून काढण्यासाठी कतरिना येणार आहे. व्हिडिओमध्ये कतरिना पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना दिसत आहे. कतरिनाला पाहून घरातील सदस्य आनंदानं उड्या मारताना दिसत आहे. व्हिडिओत कतरिना बिग बॉसच्या घरातील कुटुंबीयांसह मजेदार खेळ खेळताना दिसत आहे.
बिग बॉस 17 प्रोमो रिलीज : प्रोमोमध्ये भारती आणि हर्ष लिंबाचिया देखील दिसत आहेत. नंतर, कतरिना 'बिग बॉस 17' च्या मंचावर सलमान खानसोबत खूप मजा करताना दिसत आहे. सध्या, बिग बॉसच्या घरातील कतरिना कैफच्या आगमनाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॅटचे चाहते या दिवाळी थीम असलेल्या एपिसोडच्या प्रसारणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान 'टायगर 3'ची आगाऊ बुकिंग पाहता पहिल्या दिवशी हा चित्रपट बंपर ओपनिंग करेल असं सध्या दिसत आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त 'टायगर 3' मध्ये रेवती, इमरान हाश्मी, रिद्धी डोगरा देखील दमदार भूमिका साकारताना दिसणार आहेत. शाहरुख खानसोबत हृतिक रोशनचाही चित्रपटात खास कॅमिओ आहे.
हेही वाचा :