ETV Bharat / entertainment

Kabir Khans next directorial : कबीर खानच्या आगामी चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत झळकणार भुवन अरोरा - कबीर खानच्या आगामी चित्रपटात भुवन अरोरा

फर्जी फेम अभिनेता भुवन अरोरा कबीर खानच्या आगामी प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात तो अभिनेता कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे.

Kabir Khans next directoria
कबीर खानच्या आगामी चित्रपटात भुवन अरोरा
author img

By

Published : May 31, 2023, 4:42 PM IST

मुंबई - फर्जी या जबरदस्त गाजलेल्या हिट स्ट्रीमिंग शोमध्ये आपल्या कामाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारा अभिनेता भुवन अरोरा आता स्टार दिग्दर्शक कबीर खानच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात भुवन बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. कबीर खान हे बॉलिवूडमध्ये गाजलेल्या बजरंगी भाईजान, एक था टायगर आणि 83 सारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जातात.

अभिनेता कार्तिक आर्यनसोबत चित्रपटात मुख्य सहाय्यकाची भूमिका करत असलेला भुवन एका अनपेक्षित अवतारात दिसणार आहे. आगामी प्रोजेक्टबद्दल उत्साह व्यक्त करताना, भुवनने आयएएनएसशी शेअर केले: 'कबीर सरांसोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आणि आनंदी आहे. मी नेहमीच त्यांच्या चित्रपटांची आणि त्यांनी सादर केलेल्या कथांची प्रशंसा करत आलो आहे'.

भुवन पुढे म्हणाला की, 'हा देखील एक अतिशय आव्हानात्मक चित्रपट आहे ज्यासाठी खूप तयारी करावी लागत आहे. हा चित्रपट एका सत्य कथेवर आधारित आहे ज्यात लार्जर दॅन लाईफ कॅनव्हास आहे. मी यापूर्वी कधीही न केलेल्या भूमिकेत दिसणार आहे.'

फर्जी या स्ट्रीमिंग मालिकेत आपल्या कामाने प्रेक्षकांना प्रभावित करणाऱ्या अभिनेता भुवनला IMDb द्वारे ब्रेकआउट स्टारसाठी स्टारमीटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फर्जी मालिकेसाठी प्रिंटिंग प्रेसच्या मशिनरीवर काम करण्यासाठी त्याने मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणही घेतले होते. भुवन हा फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टीट्यूटचा माजी विद्यार्थी आहे आणि या इंस्टीट्यूटने त्याला सिनेमाचे जग मोठ्या प्रमाणावर कसे कार्य करते याची जाणीव करून दिली आहे.

कबीर खान दिग्दर्शन करत असलेल्या या बिग-बजेट चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करत आहे, ज्याने कार्तिकचा आगामी चित्रपट सत्यप्रेम की कथा हाचित्रपट देखील तयार केला आहे. या चित्रपटात कार्तिक त्याच्या भूल भुलैया 2 सह-कलाकार कियारा अडवाणीसोबत पुन्हा एकत्र काम करत आहे.

हेही वाचा -

१ ) - Sonu Sood International School : सोनू सूद तर्फे बिहारमधील अनाथ मुलं जाणार इंटरनॅशनल स्कूलमध्ये!

२) - Parineeti, When Is The Wedding? : पापाराझींची लगीनघाई पाहून लाजली परिणीती चोप्रा, पाहा काय घडले...

३ ) - Anushka And Sakshi Childhood Friend : अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी या निघाल्या बालपणीच्या मैत्रिणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.