नवी दिल्ली : अजय देवगणचा 'भोला' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मागील चित्रपट 'दृश्यम 2' मधून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणाऱ्या अजय देवगण आणि तब्बूच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र ही उत्सुकता चित्रपटगृहात कुठेही दिसली नाही. बघूया चित्रपटाने पहील्या दिवशी किती कमाई केली आहे.
रामनवमीचा लाभ मिळाला नाही: भोला 30 मार्च म्हणजेच राम नवमीला प्रदर्शित झाला. त्यामुळे सुटीचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा होती. देशभरात सुमारे 4000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट तामिळ चित्रपट 'कैथी' चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय देवगणने केले आहे. चित्रपटातील अॅक्शन आणि सस्पेन्स सीन्सवर खूप पैसे खर्च केले आहेत. ट्रेलर रिलीज होताच लोकांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली होती. पहिल्या दिवसाचे अॅडव्हान्स बुकिंग पाहून देखिल ती उत्सुकता दिसत होती. पण नंतर लोकांची उत्सुकता कमी होऊ लागली. चित्रपटाची बुकिंग फारशी नव्हती. भोलाने पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमधून 11.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. रामनवमीच्या सुट्टीचाही फायदा या चित्रपटाला मिळाला नाही. प्रचंड बजेट लक्षात घेता ही कमाई फक्त सरासरी म्हणता येईल.
'दृश्यम 2' चित्रपटातून भोलाची कमाई घटली : भोलाच्या तिकिटाची किंमत जास्त आहे. मल्टिप्लेक्समधील भोलाच्या तिकिटांच्या किमतीत यंदा पठाणनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र आता याचाही परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होतो की नाही हे पाहावे लागेल. चित्रपटाचे बजेट जवळपास 125 कोटी आहे. दुसरीकडे अजय देवगणच्या मागील 'दृश्यम 2' चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, त्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.38 कोटी रुपयांची कमाई केली होती.
भोला मोठ्या बजेटचा आहे : भोला हा चित्रपट 120 कोटींहून अधिक बजेटमध्ये बनला आहे. या बजेटनुसार येत्या काही दिवसांत चित्रपटाच्या कमाईला गती द्यावी लागणार आहे. अजयचा मागील चित्रपट 'दृश्यम 2' हा देखील साऊथचा रिमेक होता. तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे.