ETV Bharat / entertainment

Bebhan Movie : विद्युत जामवालने अनुपसिंग ठाकूरला दिल्या शुभेच्छा

author img

By

Published : Nov 8, 2022, 2:43 PM IST

दाक्षिणात्य चित्रपटातील स्टार अनुपसिंग ठाकूरच्या (Anupsingh Thakur) पदार्पणाचा चित्रपट म्हणून बेभान (Bebhan Movie) या चित्रपटाची चर्चा आहे. याशिवाय अनुपसिंगने अभिनयासह या चित्रपटात पहिल्यांदाच गायनही केले आहे. बंदा बेभान (Banda Bhebhan) हे गीत अनुपसिंग ठाकूर याच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे.

Bebhan Movie
बेभान

मुंबई: सध्या दाक्षिणात्य चित्रपट आणि तेथील कलाकार यांना बॉलीवूड आणि इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टीतून मागणी आहे. यावर्षी प्रदर्शित झालेले, हिंदीमध्ये डब झालेले, जवळपास सर्वच दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. अर्थातच संपूर्ण देशातील मनोरंजनसृष्टीचे त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. आता दाक्षिणात्य चित्रपटातील स्टार अनुपसिंग ठाकूर (Anupsingh Thakur) मराठी चित्रपट बेभान मधून मराठीत पदार्पण करतोय. इतकेच नव्हे तर त्याने या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच पार्श्वगायन केले आहे. अनुपसिंग ठाकूरचे अभिनयासह पार्श्वगायक म्हणूनही मराठीत पदार्पण होत असलेले पाहून बॉलीवूडचा ॲक्शन स्टार विद्युत जामवालने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

वेगळ्या धाटणीचा चित्रपट: दाक्षिणात्य चित्रपटातील स्टार अनुपसिंग ठाकूरच्या पदार्पणाचा चित्रपट म्हणून बेभान या चित्रपटाची चर्चा आहे. बंदा बेभान (Banda Bhebhan) हे गीत अनुपसिंग ठाकूर याच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे. शशिकांत पवार प्रॉडकशनच्या अंतर्गत मधुकर (अण्णा) देशपांडे रायगावकर आणि शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. 'झाला बोभाटा', 'भिरकीट' असे उत्तम चित्रपट केल्यानंतर 'बेभान' हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे (Anup Jagdale) घेऊन येत आहेत.

मुख्य भूमिका: दिनेश देशपांडे (Dinesh Deshpande) यांच्या कथेवर बेतलेल्या बेभान या चित्रपटाची पटकथा नितीन सुपेकर (Nitin Supekar) यांची आहे. चित्रपटाचे छायांकन कृष्णा सोरेन यांचे असून संकलक म्हणून विजय कोचीकर यांनी जबाबदारी निभावली आहे. मंगेश कांगणे यांच्या लिहिलेल्या गीतांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केले आहे. आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अनुपसिंग ठाकूर मराठीत अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे. अनुपसिंग ठाकूरसोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, स्मिता जयकर आणि अभिनेते संजय खापरे ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Vidyut Jamwal wishes Anup Singh Thakur
विद्युत जामवालने अनुपसिंग ठाकूरला दिल्या शुभेच्छा

विद्युत जामवालने शुभेच्छा दिल्या: श्रीमंत पार्श्वभूमी असलेला नायक आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या दोन तरुणी, त्यांच्यामुळे नायकात होणारा बदल हे बेभान चित्रपटाचे कथासूत्र आहे. ॲक्शन, रोमान्सचा पुरेपूर मसाला या चित्रपटात आहे. अनेक ॲक्शनपटांतून स्वतःला हिरो म्हणून सिद्ध केलेल्या विद्युत जामवालने बेभान या चित्रपटासाठी अनुपसिंग ठाकूरला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आधीच चर्चेत असलेल्या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. 'बेभान' हा चित्रपट 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.