मुंबई : 'बाई पण भारी देवा' या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. नायक-नायिकेशिवाय बनलेल्या या चित्रपटाने १९ दिवसांत ५५.३० कोटींची कमाई करून इतिहास रचला आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या या चित्रपटात ५ ज्येष्ठ अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
लेखिका वैशाली नायक यांच्या या कथेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, कहानी जबरदस्त असेल तर नायिकेचे सौंदर्य आणि सस्पेन्स नसतानाही प्रेक्षकांची मने जिंकू शकतात, ३० जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बजेट फक्त ५ कोटी रुपये होते. मात्र या चित्रपटाने देशांतर्गत ५० कोटीचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे देशांतर्गत कलेक्शन ५५.३० इतके झाले आहे, तर जगभरात या चित्रपटाचे कलेक्शन ६२ कोटींच्या वर पोहोचले आहे. तसेच मंगळवार, १८ जुलै २०२३ रोजी 'बाई पण भारी देवा'ने एकूण २५.८८% इतका व्यवसाय केला. एवढेच नाही तर 'बाई पण भारी देवा' चित्रपटाने एका दिवसात ६.१० कोटींचा गल्ला जमावला होता. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सिंगल डे कलेक्शन करणारा ठरला आहे.
चित्रपटाची कहानी आहे जरा हटके : या चित्रपटाला आयएमडीबी (IMDb) वर १० पैकी ८.९ रेटिंग देण्यात आली आहे. चित्रपटाची कथा लोकांना खूप आवडली आहे. पाच बहिणींची कथा असलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत ५ ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. या कथेत पाचही बहिणी एका स्पर्धेत भाग घेत आहेत. त्याचबरोबर कुटुंबाची काळजी घेताना प्रत्येक निकष पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न सर्वजण करत आहेत. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला चांगलीच पसंती मिळत आहे. बऱ्याच दिवसांनी एक अनोखी कथा यशस्वी झाल्यामुळे निर्मात्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमटले आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या माने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाची कहाणी हृदयाला स्पर्श करणारी : गेल्या काही काळापासून सिनेविश्वात त्याच क्लिच कथा पाहायला मिळत होत्या. चित्रपटाच्या कथेच्या मध्यभागी नायक आणि नायिका दिसतात. ज्यांच्यामध्ये प्रेमाचे फूल उमलते आणि संपूर्ण कथा त्याच्याभोवती फिरते. पण अशा चित्रपटांमध्ये 'बाई पण भारी देवा' फार हटके ठरला आहे. चित्रपटात हिरो आणि हिरोईन नसताना हा चित्रपट रूपेरी पडद्यावर धमाल करत आहे. या चित्रपटाची कहाणी तुमच्या हृदयाला स्पर्श नक्कीच करेल.
हेही वाचा :