मुंबई : 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेच्या या चित्रपटानं रूपेरी पडद्यावर धमाल केली आहे. या कॉमेडी चित्रपटानं पहिल्याच दिवशी चाहत्यांवर आपली छाप सोडली आहे. एका अहवालानुसार 'ड्रीम गर्ल 2'ने रिलीज होण्यापूर्वी सुमारे 9-10 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाचे दिग्गदर्शन राज शांडिल्यनं केले. या चित्रपटाचा पहिला भाग 2019 मध्ये रिलीज झाला होता, ज्यामध्ये आयुष्मान खुरानानं पूजा बनून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केलं होतं. आता पूजा पुन्हा एकदा परतली आहे. ती येताच तिनं चाहत्यांच्या हृदयावर राज्य करण्यास सुरुवात केली आहे. याचा अंदाज 'ड्रीम गर्ल 2' च्या पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून सहज लक्षात येऊ शकते. चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी किती कोटींची कमाई केली ते जाणून घेऊया.
आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी केली इतकी कमाई : 'ड्रीम गर्ल 2'ने दुसऱ्या दिवशी भारतात 14 कोटींची कमाई केली आहे. यासह याचित्रपटाचे एकूण कलेक्शन 24.69 कोटी रुपये झाले आहे. हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं बजेट 35 कोटी रुपये आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. 2019मध्ये आलेला चित्रपट 'ड्रीम गर्ल' हा 28 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 200 कोटींचा व्यवसाय केला होता. यापूर्वी बॉक्स ऑफिसवर सीक्वलचा बराच दबदबा राहिला आहे. आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल 2' हा पुढचा सीक्वल हिट ठरेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पूजाने केली प्रेक्षकांवर जादू : राज शांडिल्याच्या 'ड्रीम गर्ल'ला चांगलीच पसंती मिळाली होती. 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट अतिशय खळखळून हसविणारा आहे. चित्रपटात आयुष्मान खुराना हा करम आणि पूजा या दोन्ही पात्रांमध्ये अप्रतिम दिसत आहे. पूजाच्या पात्रात आयुष्मान पडद्यावर येताच पडद्यावर धमाल करतो. या चित्रपटामध्ये अनन्या पांडेची व्यक्तिरेखा अतिशय साधी आहे. 'ड्रीम गर्ल 2' चित्रपटामध्ये अन्नू कपूर, परेश रावल, अभिषेक बॅनर्जी आणि विजय राज यांनी उत्तम काम केले आहे.
हेही वाचा :