ETV Bharat / entertainment

अली मर्चंटनं हनीमूनसाठी मालदीवला जाणं केलं रद्द, गेला 'या' ठिकाणी - मालदीव सरकार

Lakshadweep Vs Maldives : पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर या फोटोंवर मालदीवमधील काही नेत्यांनी वादग्रस्त कमेंट केली. त्यानंतर तयार झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता अनेक बी-टाऊन स्टार्स मालदीवला जाणं जाणं रद्द करत आहेत.

Lakshadweep Vs Maldives
लक्षद्वीप आणि मालदीव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 11, 2024, 5:21 PM IST

मुंबई - Lakshadweep Vs Maldives : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या सुंदर आणि भव्य समुद्रकिनाऱ्यावरची फोटो सोशल मीडियावर शेअर केली, तेव्हापासून लक्षद्वीप चर्चेत आहे. लक्षद्वीपच्या सौंदर्यानं देश-विदेशात खळबळ माजवली आहे. टीव्ही आणि बी-टाऊन स्टार्स या ठिकाणाला पसंती देताना दिसत आहेत. लक्षद्वीपचे नैसर्गिक सौंदर्य पाहिल्यानंतर बी-टाऊन स्टार्सही मालदीव जाण्याऐवजी या ठिकाणाला भेट देण्याचा विचार करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर लक्षद्वीपच्या सौंदर्याची प्रशंसा केली जात आहे. आतापर्यंत बी-टाऊन स्टार्सला मालदीव पर्यटन स्थळ पसंत होत.

अली मर्चंट मालदीव जाणं केलं रद्द : आता परिस्थिती बदलेली आहे. टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस फेम अली मर्चंटनं शेवटच्या क्षणी मालदीवमधील हनीमूनचा प्लॅन रद्द केला आहे. अली मर्चंटनं अलीकडेच अंदलीब जैदीशी तिसरे लग्न केलं. अली आपल्या पत्नीला हनीमूनसाठी थायलंड घेऊन गेला आहे. याआधीन त्यानं हनीमूनसाठी मालदीवला जाण्याचा प्लॅन केला होता. लक्षद्वीपच्या सौंदर्य पाहून आणि मालदीव सरकारची आक्षेपार्ह टिप्पणी लक्षात येताच त्यानं मालदीवला जाणं रद्द केलं. अली सध्या थायलंडमध्ये पत्नीसोबत हनीमून एन्जॉय करत आहे. दरम्यान अलीनं मालदीव सरकारची आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल बोलाताना म्हटलं की, ''मी माझ्या हनिमूनसाठी मालदीव बुक केलं होतं, पण जेव्हा मी मालदीव सरकारचे वादग्रस्त विधान वाचले, तेव्हा मी शेवटच्या क्षणी माझी हनीमून ट्रिप रद्द केली. त्यानंतर मी थायलंडसाठी तिकिट बुक केली.''

अली हनिमून गेला थायलंडला : याशिवाय तो पुढील प्रवासासाठी लक्षद्वीपचे सौंदर्य निवडणार असल्याचं त्यानं सांगितलं. पुढं त्यानं म्हटलं, ''आपल्या देशाच्या सौंदर्याचा शोध घेणे खूप महत्वाचे आहे.'' अली आता पत्नीसह थायलंडच्या खोऱ्यात आहे आणि तिथून एकामागून एक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत. अलीनं 2010 मध्ये 'बिग बॉस 4' मधील त्याची सह-स्पर्धक सारा खानसोबत लग्न केलं होत. अलीचे हे पहिले लग्न होतं जे दोन महिनेच टिकलं. यानंतर त्यानं 2016 मध्ये अनम मर्चंटशी लग्न केलं. दरम्यान, 3 नोव्हेंबर 2023 रोजी अलीनं अंदलीब जैदीशी लग्न केलं.

हेही वाचा :

  1. 'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर भिडणार 'सिंघम अगेन'सोबत
  2. अंकिता लोखंडेशी बोलताना आयेशा खाननं केला मुनावर फारुकीवर गंभीर आरोप
  3. 'मोऱ्या'चे दिग्दर्शक जितेंद्र बर्डेने सेन्सॉर बोर्डाकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याचा केला आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.