ETV Bharat / entertainment

Housefull 5 Release Date OUT : अक्षय कुमारने हाऊसफुल 5 ची केली घोषणा, सांगितली रिलीजची तारीख - कॉमेडी चित्रपट हाऊसफुल 5ची घोषणा

Housefull 5 Release Date OUT: अक्षय कुमारने त्याचा कॉमेडी चित्रपट हाऊसफुल 5ची घोषणा केली आहे. आजवर रिलीज झालेल्या चारही भागांना प्रेक्षकांनी उचलून धरले होते. हा चित्रपट कधी रिलीज होणार याचीही तारीख अक्षयने सांगितली आहे.

Etv Bharat
अक्षय कुमारने हाऊसफुल 5 ची केली घोषणा
author img

By

Published : Jun 30, 2023, 4:34 PM IST

मुंबई - अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षय कुमारने आपल्या शानदार कॉमेडी चित्रपट हाऊसफुलचा पाचवा भाग तयार होत असल्याचे चाहत्यांना कळवले असून त्याने या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर पोस्टर शेअर करून हाऊसफुल्ल ५ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही उघड केली आहे. साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करत असून तरुण मनसुखानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तरुण मनसुखानी यांनी यापूर्वी ड्राईव्ह, दोस्ताना, कभी अलविदा ना कहना आणि माय नेम इज खान या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

अक्षय कुमारची हाऊसफुल 5 ची घोषणा - अक्षय कुमारने सोशल मीडियावर येऊन चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. आता अक्षय कुमारच्या हाऊसफुल 5 च्या घोषणेनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. अक्षय कुमारने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'पाचव्यांदा वेडेपणासाठी सज्ज व्हा, साजिद नाडियादवालाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन तरण मनसुखानी करणार आहेत.'विशेष म्हणजे साजिद नायियादवाला निर्मित सत्य प्रेम की कथा नुकताच रिलीज झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. बॉक्स ऑफिसवर तडाखेबंद कामगिरी या चित्रपटाने केली आहे. या पार्श्वभूमीवर हाऊसफुल 5 या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार? - अक्षय कुमारचा चित्रपट हाऊसफुल ५ हा चित्रपटा पुढील वर्षी २०२४ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी, अक्षयच्या चाहत्यांसाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे २०२४ च्या दिवाळीला सलमान खानचा चित्रपट प्रेम की शादी, अजय देवगणचा सिंघम 3, हेरा फेरी 3 आणि कार्तिक आर्यनचा भूल भुलैया-3 रिलीज होण्यासाठी सज्ज आहेत. अशा परिस्थितीत २०२४ च्या दिवाळीला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका होणार आहे. अद्याप या सर्व चित्रपटांच्या रिलीजला अवधी आहे. तोपर्यंत बॉक्स ऑफिसवर होणारी टक्कर व त्यातून हाणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी काहीतरी सकारात्मक निर्णय निर्माते मिळून घेऊ शकतात.

हेही वाचा -

१. Day 1 Box Office Collection : 'सत्य प्रेम की कथा' चित्रपटाने पहिल्या दिवशी केली बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई

२. Bigg Boss Ott 2 : सलमान खानच्या बिग बॉस ओटीटी 2 शोवर युजर भडकले

३. A Tailor Murder Story Teaser Out: कन्हैया लालच्या खुनावर आधारित चित्रपटाचा टीझर रिलीज, नोव्हेंबरमध्ये होणार रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.