मुंबई - Aishwarya Rai : ऐश्वर्या राय संध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पॅरिस फॅशन वीकमध्ये तिनं रॅम्प वॉक केला. त्यानंतर अनेकांनी तिचे सोशल मीडियावर कौतुक केले होते. दरम्यान आता ऐश्वर्या रायनं मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित फॅशन इव्हेंटमध्ये हजेरी लावली आहे. काल रात्री 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यक्रमात आदिती राव हैदरी, सिद्धार्थ, गौहर खान आणि फातिमा सना शेख यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये ऐशनं काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. यावर तिनं लाईट मेकअप केला होता. याशिवाय तिनं केस ही मोकळी सोडली होती. या लूकमध्ये ती खूप देखणी दिसत होती.
चाहत्यांनी ऐश्वर्याच्या व्हिडिओवर केल्या कमेंट : ऐश्वर्या रायनं या कार्यक्रमादरम्यान रेड कार्पेटवर रस्त्यावर होणाऱ्या छेडछाडीविरोधात वक्तव्य केलं होतं. तिनं म्हटलं, मला येथे तुमच्या उपस्थितीचे कौतुक वाटते. ही एक घटना महत्त्वाची जी महत्त्वापूर्ण मुद्यांना संबोधित करते. रस्त्यावर महिलांवरील छळवणूक, ही वाईट आहे. याशिवाय माझा विश्वास आहे की हे पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीची सुचना आहे. लोकांना सुरक्षित आणि संरक्षित वाटले पाहिजे हे खरोखर महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमातील ऐश्वर्याचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. तिच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत तिचे कौतुक करत आहे. या पोस्टवर कमेंट करत एका चाहत्यानं लिहलं, 'ऐश तू खूप सुंदर आहे'. दुसऱ्या एकानं लिहलं, 'तुझा मी खूप मोठा चाहता आहे'. आणखी एकानं लिहलं की, 'तुझा चित्रपट कधी येणार आहे'. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय अनेकजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहे.
ऐश्वर्या राय झाली ट्रोल : ऐश्वर्याच्या लूकवर अनेकजणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या व्हिडिओवर कमेंट करत एका ट्रोलरनं लिहलं, 'खूप जास्त वजन वाढलं आहे. थोड वजन कमी कर' दुसऱ्या एकानं लिहलं, 'असे दिसते की वांद्रे येथील एक आंटी मध्यरात्री ख्रिसमससाठी तयार झाली आहे'. आणखी एकानं लिहलं, 'ऐशच लूक खूप वाईट आहे' अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहे. ऐश्वर्या रायच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटी मणिरत्नमच्या 'पोनियिन सेल्वन 2' मध्ये दिसली होती. तिचा हा चित्रपट खूप हिट झाला होता.
हेही वाचा :