ETV Bharat / entertainment

आदित्य रॉय कपूरने कथित गर्लफ्रेंड अनन्या पांडे स्टारर 'खो गए हम कहाँ'च्या स्क्रीनिंगला लावली हजेरी - अर्जुन वरैन सिंग दिग्दर्शित खो गये हम कहाँ

Aditya Roy Kapur attends KGHK screening : अर्जुन वरैन सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या 'खो गये हम कहाँ' चित्रपटाचे खास स्क्रिनिंग मुंबईत आयोजित करण्यात आले होते. अभिनेत्री अनन्या पांडे, आदर्श गौरव आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. या स्टार स्टडेड स्क्रिनिंगला अनन्याचा कथित बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूर हजर होता.

Aditya Roy Kapur attends KGHK screening
आदित्य रॉय कपूरनेची कथित मैत्रीण अनन्या पांडे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 11:08 AM IST

मुंबई - Aditya Roy Kapur attends KGHK screening : अभिनेता आदित्य रॉय कपूरने त्याची कथित मैत्रीण आणि अभिनेत्री अनन्या पांडेचा आगामी चित्रपट 'खो गये हम कहाँ' च्या स्क्रीनिंगला बॉलिवूडमधील अनेक स्टार्ससह हजेरी लावली. मुंबईत सोमवारी रात्री झालेल्या स्क्रिनिंगमधील आदित्य आणि अनन्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झळकले आहेत.

Aditya Roy Kapur attends KGHK screening
खो गए हम कहाँच्या स्क्रीनिंगला अनन्या पांडे

यावेळी आदित्य कॅज्युअल चेकर्ड ग्रे शर्ट आणि ग्रे डेनिम्समध्ये स्पोर्टी कॅपसह हजर होता. अनन्याने तिच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी पांढरा क्रॉप टॉप घातला होता. हा टॉप तिने मिनी ब्लॅक-ब्लू डेनिम स्कर्ट आणि ब्लॅक ब्लेझरसह जोडला होता. आदित्य शिवाय अनन्याच्या बेस्ट फ्रेंड्स सुहाना खान आणि शनाया कपूर यादेखील हजर होत्या.

अलिकडेच आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूर यांनी लोकप्रिय टॉक शो 'कॉफी विथ करण सीझन 8 च्या एपिसोडमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी करणने आदित्यला अनन्याच्या रिलेशनशिपबद्दलचे काही प्रश्न विचारले होते. त्यावर त्याने मजेशीर उत्तर देताना म्हटले होते की तुम्ही मला रहस्ये विचारु नका कारण मी खोटं बोलू शकत नाही.

Aditya Roy Kapur attends KGHK screening
खो गए हम कहाँच्या स्क्रीनिंगला आदित्य रॉय कपूर

जेव्हा अनन्या पांडेने सारा अली खानसोबत करण जोहरच्या या टॉक शोमध्ये आली होती तेव्हा करणने साराला विचारले की अनन्याकडे अशी कोणती गोष्ट आहे जी तिच्याकडे नाही. यावर साराने पटकन उत्तर दिले, 'नाईट मॅनेजर'. अनन्याचा कथित बॉयफ्रेंड आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर याची अलिकडेच प्रसारित झालेली 'नाईट मॅनेजर' ही वेबसीरिज चर्चेत आहे. साराचे उत्तर ऐकून अनन्याने उत्तर दिले, "मला अनन्या कोय कपूर असल्याचे खूप वाटत आहे."

अनन्या आणि आदित्य काही काळापासून डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. गेल्या वर्षी क्रिती सेनॉनच्या दिवाळी पार्टीत जेव्हा दोघांनी एकत्र हजेरी लावली तेव्हा याची चर्चा वाढीस लागली होती. मात्र, दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. अनन्याचा 25 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघांनी अलीकडेच मालदीवलाही भेट दिली होती.

नवोदित दिग्दर्शक अर्जुन वरैन सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या 'खो गये हम कहाँ' बद्दल बोलायचं तर, हा चित्रपट तीन मित्रांबद्दलची 'कमिंग-ऑफ-डिजिटल-युग' कथा आहे. अनन्याशिवाय या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

'खो गये हम कहाँ' मध्ये इमाद (सिद्धांत चतुर्वेदी), आहाना (अनन्या पांडे) आणि नील (आदर्श गौरव) या तिघांच्या मैत्रीची ही कथा आहे. या चित्रपटाचे उत्तम पद्धतीनं प्रमोशन सुरू आहे. याशिवाय अनन्या पांडे लवकरच 'Call me Bae' या आगामी मालिकेतून OTT मध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान, आदित्य दिग्दर्शक अनुराग बासूच्या 'मेट्रो...इन दिनो'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा -

  1. 'अ‍ॅनिमल'नं बॉक्स ऑफिस कलेक्शनने केला 500 कोटीचा आकडा पार
  2. रजनीकांत स्टारर 'लाल सलाम'मधील पहिलं धमाल गाणं लॉन्च
  3. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची दिल्ली उच्च न्यायालयात धाव, ईडीनं दाखल केलेलं पुरवणी आरोपपत्र रद्द करण्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.