ETV Bharat / entertainment

12th Fail vs Tejas box office day 7: विक्रांत मॅसीचा '12th Fail' नं ओलांडला 10 कोटीचा टप्पा, कंगनाचा 'तेजस' घुटमळला

विक्रांत मॅसी स्टारर विधू विनोद चोप्राच्या '12th Fail' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कंगना राणौतच्या तेजस चित्रपटावर मात केली आहे. आता या दोन्हा चित्रपटांच्या सहाव्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर एक नजर टाकूया.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 4:32 PM IST

12th Fail vs Tejas box office day 7
12th Fail विरुद्ध तेजस

मुंबई - अभिनेत्री कंगना राणौतला तिच्या थरारक हवाई अ‍ॅक्शन चित्रपट तेजसकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्रया चित्रपटाकडं प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि थिएटरमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांनी तेजस ऐवजी विक्रांत मॅसीच्या '12th Fail' चित्रपटाची तिकीटे घेणं पसंत केलं. बॉक्स ऑफिसवर झालेल्या '12th Fail' विरुद्ध तेजस या टक्करीमध्ये कंगनाच्या चित्रपटाला अपयश आलं. आता या दोन रिलीजच्या बॉक्स ऑफिस परफॉर्मन्सवर एक नजर टाकूयात.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

इंडस्ट्री ट्रॅकर Sacnilk च्या मतानुसार तेजसची थिएटर्समधील सुरुवात तुलनेने संथ गतीनं झाली. पहिल्या सहा दिवसांत भारतात एकूण 5.15 कोटी रुपयांची कमाई होऊ शकली. त्यात आणखी 40 लाखाची भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील एकूण संकलन अंदाजे 5.55 कोटी रुपये होईल. सर्वेश मेवारा दिग्दर्शित तेजस हा चित्रपट देशाच्या रक्षणासाठी समर्पित भारतीय वायुसेना (IAF) अधिकाऱ्याभोवती फिरणारा आहे. कंगना तेजस चित्रपटात अंशुल चौहान, वरुण मित्रा, आशिष विद्यार्थी आणि विशाक नायर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

दरम्यान, Sacnilk च्या मतानुसार '12th Fail' ने थिएटरमध्ये जोरदार सुरुवात केली होती. चित्रपटगृहांमध्ये सहा दिवसांत भारतात निव्वळ कमाई म्हणून 11.74 कोटी रुपयांची प्रभावी कमाई केली. सातव्या दिवशी, सुरुवातीच्या अंदाजानुसार चित्रपट सर्व भाषांमध्ये आणखी 1.30 कोटी रुपये कमवू शकतो. अशा तऱ्हेनं बॉक्स ऑफिसवर '12th Fail' चं 13.04 कोटी रुपयांचे एकूण संकलन होईल.

विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '12th Fail' हा चित्रपटा आयपीएस अधिकारी मनोज कुमारची कथा आहे. जो कठीण असलेल्या युपीएससी स्पर्धा परीक्षेला बसतो आणि पुन्हा शैक्षणिक शिक्षण घेण्याचा निर्णय घेतो. या चित्रपटात अभिनेत्री मेधा शंकर, संजय बिश्नोई आणि हरीश खन्ना यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विनोद चोप्रा फिल्म्स या बॅनरखाली त्यांनी स्वतःच या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हेही वाचा -

  1. Nick And Priyanka : निक जोनासनं प्रियांका चोप्राचा फोटो शेअर करत 'जस्ट लुकिंग लाइक अ व्वा' ट्रेंड केला फॉलो

2. Shah Rukh Khan's Birthday:'जवान' दिग्दर्शक अ‍ॅटलीनं शाहरुख खानला वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा; म्हटलं लव्ह यू सर...

3. Varun and lavanya marriage : चिरंजीवी आणि नागा बाबू यांनी सोशल मीडियावर वरुण तेज आणि लावण्याच्या लग्नाची फोटो केली शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.