अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघात उत्साहाचे वातावरण असल्याचे ते म्हणाले.
संग्राम जगताप हे आपल्या पत्नीसह मतदान केंद्रावर आले होते. मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे. सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडीसाठी उत्साह आहे. नागरिकांना आपला वाटणारा लोकप्रतिनिधी पाहिजे असे जगताप म्हणाले.