पुणे : पुण्यातील उत्तमनगर परिसरामध्ये एका सराफा व्यावसायिकाने एका बांधकाम व्यावसायिकासह अनेक नागरिकांचे सोने घेऊन पोबारा केला. सराफा व्यावसायिकाने सोने दुरुस्तीच्या बहाण्याने 40 तोळे सोने घेऊन पळून ( Runaway with 40 Carat of Gold ) गेला. हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यावर बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये ( Uttamnagar Police Station ) सराफावर गुन्हा दाखल ( Pune Crime News ) करण्यात आला आहे.
सराफा व्यावसायिकावर गुन्हा दाखल : सुनील जगदीश वर्मा ( वय 41 रा. वेस्ट कोस्ट शिवणे ) या सराफावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोमनाथ मार्तंड इंगवले ( वय 41 राहणार शुभ कल्याण नांदेड सिटी, पुणे ) यांनी फिर्याद दिलेली आहे. सोमनाथ इंगवले हे बांधकाम व्यावसायिक असून, त्यांचीही यात फसवणूक झाली आहे. संशयित आरोपी सुनील वर्मा यांचे शिवणे येथील नांदेड सिटी रोडवर स्वामी सानिध्य विहारमध्ये गणराज ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे.
अनेकांची केली फसवणूक : पुण्यातील उत्तमनगर भागामध्ये एका सराफ व्यापाराने त्याच भागात राहणारे एक बांधकाम व्यावसायिक व अन्य काही नागरिक यांच्याकडून सोन्याचे दागिने दुरुस्त करून देतो म्हणून घेऊन चाळीस तोळे सोने घेऊन फरार झाल्याचा गुन्हा उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे.
हेही वाचा : Pune Crime News : पुणे तिथे काय उणे, पठ्ठ्याने विद्यार्थ्यांसाठी ठेवली अनलिमिटेड दारु; हॉटेल मालकाला अटक