ठाणे- शहरातील वाढते खड्डे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे एकीकडे ठाणेकर हैराण आहेत. असे असताना प्रशासनाकडून खड्डे बुजवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. यामुळे दररोज होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारे नागरिकांचे हाल याचा निषेध करण्यासाठी ठाणे युवक काँग्रेस करून खड्ड्यांच्या भोवती रांगोळी काढून एक अनोखे आंदोलन करण्यात आले.
हजारो कोटींचे बजेट असलेल्या ठाणे महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश करण्यात आला आहे असे असले तरी रस्त्यांची अवस्था बिकट आहे. याचा निषेध करणयासाठी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच घोडबंदर रोस्त्यावरील दोन्ही बाजूच्या सर्विस रोडची अवस्था वाईट झाल्यामुळे शुक्रवारी हे अनोखे आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.