ठाणे : ठाण्यातील मुंब्रा परिसरात असलेल्या डोंगराळ भागात दरड कोसळून landslide in Mumbra Thane एका महिलेचा मृत्यू Woman dies due to landslide in Mumbra झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये दोन घरांचे मोठे नुकसान damage two houses landslide mumbra देखील झाले आहे. मुंब्रा गावदेवी, लाल किल्ला ढाबा जवळ, मुंब्रा बायपास रोडच्या बाजूच्या डोंगरावरील ही दगड कोसळली. कविता वानपसरे Kavita Vanpasare असे या ३५ वर्षीय मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून याच भागात असलेल्या १४ कुटुंबीयांना इतरत्र हलवण्यात आले आहे. Landslide Mumbra Thane
मृत्यूच्या रूपात दगड घरंगळत आला - या दरडीत अंदाजे ४ x ३ फूट आकाराचा दगड वेगाने घरंगळत खाली आला. या भल्या मोठ्या दगडामुळे मुंब्रा बायपास नजीक असलेल्या साईकृपा आणि गजराज सोसायटी या दोन चाळीतील काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी नुकसान झालेल्या घरात झोपलेल्या एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड धावले मदतीला - ही दरड कोसळल्यानंतर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मुंब्रा प्रभाग समितीचे कार्यालयीन अधिक्षक व त्यांचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रतिसादक, वनविभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान १- फायर वाहन व १- रेस्क्यु वाहनासह उपस्थित राहून या महिलेचा मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. तसेच सदर ठिकाणी डोंगरावरील आणखी काही दगड कोसळण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने खालील वस्तीमधील एकूण १४ सदनिका रिकाम्या करून रहिवाश्यांची राहण्याची व्यवस्था नजीकच्या ठा.म.पा.च्या शाळेमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान या ठिकाणी माजी मंत्री तथा स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील घटनास्थळी धाव घेत स्थानिकांची भेट घेतली. शासनाकडून १० लाख दिले जातात ते ठीक आहे, मात्र या डोंगरावर आणखी काही अशे भलेमोठे दगड दिसून येत आहेत आणि ते काढणं गरजेचं आहे, नाही तर भविष्यात आणखी असे काही अपघात होण्याची शक्यता आव्हाड यांनी वर्तवली आहे.