ETV Bharat / city

Tree Collapsed In Thane मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात झाडे पडून जात आहेत नागरिकांचे जीव; वीस मिनिटे झाडाखाली तडफडून महिलेचा मृत्यू - Tree Collapsed In Thane

Tree Collapsed In Thane निधीचा अभाव अकार्यक्षम अधिकारी संवेदना हरवलेले प्रशासन यामुळे मागील वर्षभरात अनेकांना झाड पडून आपला जीव गमवावा लागला आहे. तक्रारींकडे केलेले दुर्लक्ष लोकांच्या जीवावर कसे बेतते, याचा प्रत्यय ठाण्यात पाहायला मिळाला आहे. Woman Dead Tree Collapsed In Thane एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde हे वेगाने निर्णय घेऊन नागरिकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेचे Thane Municipal Corporatio प्रशासन मात्र ढिम्मच असल्याचे समोर आले आहे.

Tree Collapsed In Thane
Tree Collapsed In Thane
author img

By

Published : Sep 10, 2022, 8:04 PM IST

ठाणे निधीचा अभाव अकार्यक्षम अधिकारी संवेदना हरवलेले प्रशासन यामुळे मागील वर्षभरात अनेकांना झाड पडून आपला जीव गमवावा लागला आहे. तक्रारींकडे केलेले दुर्लक्ष लोकांच्या जीवावर कसे बेतते, याचा प्रत्यय ठाण्यात पाहायला मिळाला आहे. Woman Dead Tree Collapsed In Thane एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde हे वेगाने निर्णय घेऊन नागरिकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेचे Thane Municipal Corporatio प्रशासन मात्र ढिम्मच असल्याचे समोर आले आहे. कारण याच झाडाची धोकादायक असल्याची तक्रार नागरिकांनी पालिकेकडे केली होती.

कोलबाड येथील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपावर पिंपळाचे मोठे झाड पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. काही समजण्याच्या आताच हे भलेमोठे झाड या मंडपावर मुळासकट कोसळले. Woman Dead Tree Collapsed In Thane पाऊस आल्यामुळे मंडपाच्या बाजूलाच असलेल्या शेडमध्ये मृत महिला आणि त्यांचा मुलगा उभा होता. हे दोघेही या झाडाच्या खाली आल्यानंतर तब्बल २० मिनिटे ही महिला झाडाखाली तडफडत होती. मात्र ७० पेक्षा अधिक माणसांनी प्रयत्न करूनही हे झाड जराही हलेले नाही. अखेर २० मिनिटांच्या नंतर अग्निशमन विभागाने येऊन हे झाड हलवले. Woman Dead Tree Collapsed In Thane मात्र तोपर्यंत या महिलेचा तडफडून जीव गेला होता. येत्या डिसेंबरला मुलाचे लग्न बघण्याचे स्वप्न मात्र या महिलेचे अपूर्णच राहिले.

वीस मिनिटे झाडाखाली तडफडून महिलेचा मृत्यू

गेल्या 3 ते 4 दिवसांपासून संध्याकाळीच मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने विसर्जनाच्या शेवटच्या दिवशीच महिलेचा बळी घेतला आहे. राजश्री वालावलकर (५६) असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून त्या रुणवाल गार्डन या ठिकाणी राहायला आहेत. Woman Dead Tree Collapsed In Thane वालावलकर यांच्यासोबत त्यांचा मुलगा प्रतीक (३२) आणि काव्हिन्सी परेरा (४०), सुहासिनी कोलूगुंडे (५६), आणि दत्ता जावळे (५०) असे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये राजश्री वालावलकर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. शुक्रवारी ८ ते ८.३० च्या दरम्यान कोलबाड येथे सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये शेवटची आरती सुरु असताना ही घटना घडली आहे.

आई आणि मुलगा एकाच ठिकाणी अडकले जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरु असताना हे २५ ते ३० वर्ष पिंपळाचे जुने झाड मंडपावर कोसळले. मंडपाच्या बाजूलाच असलेल्या शेडमध्ये १५ ते २० लोक उभे होते. काही समजण्याच्या आतच पाच ते सहा माजली उंच असलेले हे झाड कोसळले आणि या झाडाखाली राजश्री वालावलकर आणि त्यांचा मुलगा प्रतीक हे दोघेही अडकले. राजश्री या खाली तर थोडा वर प्रतीक अडकला. मात्र प्रतीकही अडकल्याने त्याला आईची मदत करता आली नाही. झाड पडल्यानंतर घटनास्थळी असलेले मोठ्या संख्येने असलेल्या नागरिकांनी झाड हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र ७० ते ८० लोकांची ताकदही कमी पडली. राजश्री या आतून आवाज देत होत्या. मात्र सर्वच जण हतबल होते. अखेर अग्निशमन दल २० मिनिटांनी आल्यानंतर पटापट फांद्या कापून झाड बाजूला काढले. मात्र तोपर्यंत राजश्री वालावलकर यांचा तडफडून मृत्यू झाला होता.

आरती ठरली शेवटची रुणवाल नगर या ठिकाणी राहणाऱ्या मृत राजश्री वालावलकर या प्रत्येक वर्षी कोलबाड येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जनासाठी जात होत्या. यावर्षीही दरवर्षी प्रमाणे त्या विसर्जनासाठी गेल्या होत्या. मात्र यावर्षी त्यांच्यावर उत्सवाच्या ठिकाणीच काळाने घाला घातल्याने त्यांची ही आरती शेवटची आरती ठरली. आता त्या कधीच आरतीसाठी येणार नाहीत, अशी खंत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

मुलाचे लग्न बघण्याचे स्वप्न अपूर्ण मृत राजश्री वालावलकर यांचा मुलगा प्रतीक याचे येत्या डिसेंबरमध्ये लग्न होणार होते. त्याच्या लग्नाची तयारीही घरी सुरु होती. मात्र त्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने मुलाचे लग्न बघण्याचे त्यांचे स्वप्नही अपूर्ण राहिले. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबियांवरच शोककळा पसरली आहे. प्रशासन मात्र चौकशीच्या पलिकडे काहीच करू शकत नाही, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या शहरातच प्रशासन सुस्त फांदी छाटणीकडे दुर्लक्ष केल्याने दोन वर्षात १०८१ झाडे कोसळली, तर ६७० फांद्या पडल्या. काही वर्षांपूर्वीच अंगावर झाड पडून एका वकिलाचा तर एका रिक्षाचालकाचा देखील मृत्यू झाला होता. एवढ्या दुर्घटना होऊनही ठाणे महापालिका प्रशासनाने यापासून बोध घेतलेला नाही. फांद्या छाटणीकडे दुर्लक्ष केल्यानेच झाड उन्मळून पडत असून दोन वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात तब्बल १०८१ झाडे उन्मळून पडली आहे. तर ६७० फांद्या पडल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या सोसायटीच्या परिसरात हे पिंपळाचे झाड होते. त्या संबंधित सोसायटीने ठाणे महापालिकेला फांद्या तोडण्यासाठी पत्र देऊनही महापालिकेने कोणत्याही प्रकारची हालचाल केली नसल्याचा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शहरातच प्रशासन सुस्त असल्याची टीका आता जाणकार करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.