ETV Bharat / city

सर्वसामान्यांचा वडापाव झाला महाग; समोसा, भज्यांच्या किंमतीवर देखील परिणाम

author img

By

Published : May 28, 2022, 8:41 PM IST

श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता असलेला वडापाव महागाई वाढल्याने आता महाग ( Vadapav Price Increased ) झालाय.

ठाणे राजमाता वडापाव दुकान
ठाणे राजमाता वडापाव दुकान

ठाणे - श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता असलेला वडापाव महागाई वाढल्याने आता महाग ( Vadapav Price Increased ) झालाय. वडा आणि पाव या दोन्ही गोष्टींसाठी लागणारे साहित्य महागल्याने इंधन दरवाढीचा परिणाम म्हणून आता वडापाव दोन रुपयांनी महाग झालाय. यामुळे सामान्यांच्या तोंडातला घास काढून घेतलाय, असे म्हटलं होतं.

गॅस सिलेंडर महागले - दोन ते पाच रुपयांची दरवाढ होण्यामागे वडापाव बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य प्रचंड महाग झाल्याने करण्यात आली आहे. वड्या मधील बटाटा, कोथिंबीर असो किंवा चण्याचे पीठ एवढेच काय तर पाव बनवण्याकरता लागणारा मैदा आणि वडा तळण्याकरता लागणारे तेल गॅस सिलेंडर हे देखील महागले आहे.

ठाण्यातील प्रसिद्ध राजमाता वडापाव येथे रोज हजारो लोक चव चाखण्यासाठी खवय्ये येत असतात. मात्र, सर्वच दरवाढ झाल्यामुळे राजमाता वडापाव यांनी सुद्धा दरवाढ केली आहे. वडापाव खाण्याकरता येणाऱ्या सर्वांनाच दरवाढ का करण्यात आली आहे, याबाबत समजून सांगावे लागते, असे राजमाता वडापावचे मालक निलेश शेट्टी यांनी म्हटले आहे.

ग्राहकांची प्रतिक्रिया घेताना प्रतिनिधी

किंमत वाढल्याने वड्याची साईझ झाली छोटी - एकीकडे वाढती महागाई ही जशी व्यवसायिकांना नुकसान करते तेवढी ती सामान्य जनतेला नुकसान कार्य करते. यामुळे जर दर वाढवले तर ग्राहक संख्या कमी होईल त्याचा परिणाम धंद्यावर होऊ शकतो हे लक्षात घेता काही वडापाव विक्रेत्यांनी डोकं लढवले आहे. वडा आणि पाव दोघांचाही आकार कमी केला आह. म्हणजे किंमत न वाढवता आकार कमी करून व्यावसायिक स्पर्धेत टिकून होण्याकरता अनेकांनी नामी शक्कल लढवली आहेत.

वड्याला महाग करणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या - वडा, समोसा, भजी यांना महाग करणाऱ्या गोष्टी मध्ये बेसन, पाव, वीज मालमत्ता कर, पाणी, इंधन, बटाट्याचे दर, कोथिंबिरी, तेल, मसाल्याचे दर कारणीभूत आहे. वडापाव सोबत भजी, समोसा यांच्यावरही महागाईची कुऱ्हाड कोसळली आहे. समोसा दीड रुपयांनी आणि भजी प्लेट ही चार रुपयांनी महाग झाली आहे.

हेही वाचा - Aryan Khan Drug case : आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्याने समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.