ETV Bharat / city

महामार्गावर ट्रकला मागून ट्रकची धडक; दोनजण जखमी - thane truck accident news

मुंबई-नाशिक महामार्गावर मंगळवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास कोळशाने भरलेल्या ट्रेकला मागून गाईचा खुराक भरलेल्या ट्रकने धडक दिली. यात दोन जण जखमी झाले आहेत.

accident
मुंबई नाशिक महामार्गावर ट्रकची ट्रकला धडक
author img

By

Published : Mar 24, 2021, 3:16 PM IST

Updated : Mar 24, 2021, 5:15 PM IST

ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावर मंगळवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास कोळशाने भरलेल्या ट्रेकला मागून गाईचा खुराक भरलेल्या ट्रकने धडक दिली. यानंतर सगळ्या महामार्गावर कोळसाच कोळसा झाला. तर या विचित्र अपघातात दोनजण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रस्त्यावर कोळशाचे साम्राज्य पसरल्याने मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी परिश्रम घेत वाहतूक खुली केली.

महामार्गावर ट्रकला मागून ट्रकची धडक

हेही वाचा - मुंबई पोलीस दलात एकाच दिवशी ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या, गुन्हे शाखेतील तब्बल ६५ जणांचा समावेश

याबाबत आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संतोष कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास टाटा ट्रक सीजी-07-सीए-7186 हा कोलशाने भरलेला ट्रक कैसर अन्सारी यांचा असून चालक सहजोद इकबाल अहमद हा छत्तीसगड ते मुंबई असा प्रवास करीत होता. तर दुसरा अशोक लेलँड चा ट्रक एमएच-21 बीएच-2886 याचे मालक आणि चालक प्रमोद पाटोदकर हा धुळ्याहून मुंबईकडे येत होता. यात गायीचा खुराक भरलेला होता. मंगळवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजता गायीचा खुराक भरलेला ट्रक हा मुंबई वाहिनीवर साकेत पुला शेजारी, रुस्तमजी टॉवरसमोर, साकेत ठाणे येथे कोळशाच्या ट्रकवर मागून भरधाव वेगाने आदळला आणि विचित्र अपघात घडला. या अपघातात} कोळशाने भरलेला ट्रकमधील कोळसा हा महामार्गावर सांडला आणि वाहतुकीचा चक्क जाम झाला. सादर घटनेची माहिती मिळताच ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापनची टीम, स्थानिक प्रादेशिक वाहतूक विभागाची} टीमने तसेच स्थानिक राबोडी पोलिसांच्या टीमने आणि अग्निशमन दलाच्या टीमने जेसीबी-1, हायड्रॉ च्या सहाय्याने रस्त्यावरील कोळसा आणि अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला केले आणि वाहतूक कोंडी सोडविली. त्यानंतर काही काळाने वाहतूक कोंडी सुटली.

दोघे जखमी

अशोक लेलँड ट्रक चालक प्रमोद पाटोदकर (34 वर्ष) यांच्या डोक्याला आणि मानेला किरकोळ दुखापत झाली आहे. टाटा ट्रक क्लिनर मोसिम कासिम खान (25 वर्ष) यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून दोघांनाही उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे हलविण्यात आले आहे.

हेही वाचा - राज्यातील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

Last Updated : Mar 24, 2021, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.