ETV Bharat / city

ठाणे अतिरिक्त आयुक्तांचा एसी बंद करून मनसेने नाट्यगृहातील असुविधांबद्दल  विचारला जाब - मनसे

ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील एसी बऱ्याचदा बंद असतो. याचा नाहक त्रास नाट्य कलावंतांना आणि प्रेक्षकांना होता. याचा जाब विचारण्यासाठी मनसेने आंदोलन केले.

आयुक्तांचा एसी बंद करून मनसेने विचारला जाब
author img

By

Published : Jul 24, 2019, 10:48 AM IST

अभिनेता भरत जाधव यांनी ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाबाबत फेसबुक द्वारे व्यक्त केलेल्या खंताची दखल आज ठाण्यातील मनसैनिकांनी घेतली. मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांची भेट घेत त्यांच्या कार्यालयातील एसी बंद करून जाब विचारला.

अभिनेता भरत जाधव यांनी दोन दिवसांपुर्वी ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सुरु असलेल्या 'सही रे सही' या नाटका दरम्यान नाट्यगृहातील एसी बंद असल्यामुळे झालेला त्रास आणि नाट्यगृहाबाबत फेसबुक द्वारे खंत व्यक्त केल्याने डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आणि प्रशासनाला उशिरा का होईना जाग आली.

आयुक्तांचा एसी बंद करून मनसेने विचारला जाब

मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांची भेट घेत त्यांच्या कार्यालयातील एसी बंद करून नाट्यगृहातील असुविधांबाबत जाब विचारला. ठाणे महानगर पालिका अनेक गोष्टींवर करोडो रुपये खर्च करतेय मात्र ठाणेकरांना सुसज्य असं एक नाट्यगृह देऊ शकत नाही ही ठाणेकरांची दुःखाची गोष्ट आहे. भरत जाधव यांनी फेसबुकला टाकलेल्या पोस्टने ठाणे शहराची लाज संपुर्ण महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली आहे. हे सर्व बघून एक ठाणेकर म्हणून मला याची लाज वाटली. म्हणून मी या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आलो असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. तसेच येत्या १० दिवसांत नाट्यगृहाचं काम सुरु केलं नाही तर मनसे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारादेखील जाधव यांनी दिला.

या प्रकरणाबाबत पालिका प्रशासनाला विचारले असता जे घडलं ते चुकीचं घडलं, नाट्यगृहात जो काही बिघाड झाला होता तो तांत्रिक बिघाड होता. तो तातडीने दुरुस्त करण्यात आला असून यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेण्यात आली आहे. तर पालिका आयुक्तांनीदेखील सूचना दिल्या असल्याचे महापालिका उपायुक्त संदिप माळवी यांनी सांगितले.

Intro:घाणेकरच्या बंद एसी विरोधात मनसेने केले आंदोलन अतिरिक्त आयुक्तांचा एसी बंद करून विचारला जाबBody:अभिनेता भरत जाधव यांनी ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाबाबत फेसबुक द्वारे व्यक्त केलेल्या खतांची दखल आज ठाण्यातील मनसैनिकांनी घेतली. मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांची भेट घेत त्यांच्या कार्यालयातील एसी बंद करून जाब विचारला. 
अभिनेता भरत जाधव यांनी दोन दिवसांपुर्वी ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सुरु असलेल्या सही रे सही या नाटका दरम्यान नाट्यगृहातील एसी बंद असल्यामुळे झालेला त्रास आणि नाट्यगृहाबाबत फेसबुक द्वारे खंत व्यक्त केल्याने डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला, आणि प्रशासनाला उशिरा का होईना जाग आली, त्यानंतर आज मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांची भेट घेत त्यांच्या कार्यालयातील एसी बंद करून नाट्यगृहातील असुविधांबाबत जाब विचारला. ठाणे महानगर पालिका अनेक गोष्टींवर करोडो रुपये खर्च करतेय मात्र ठाणेकरांना सुसज्य असं एक नाट्यगृह देऊ शकत नाही हि ठाणेकरांची दुःखाची गोष्ट आहे, भरत जाधव यांनी फेसबुक ला टाकलेल्या पोस्ट ने ठाणे शहराची लाज हि संपुर्ण महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली आहे हे सर्व बघुन एक ठाणेकर म्हणुन मला याची लाज वाटली म्हणुन मी या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आलो असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले तसेच येत्या १० दिवसांत नाट्यगृहाचं काम सुरु केलं नाही तर मनसे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देखील जाधव यांनी दिला.
तर या प्रकरणाबाबत पालिका प्रशासनाला विचारले असता जे घडलं ते चुकीचं घडलं, नाट्यगृहात जो काही बिघाड झाला होता तो तांत्रिक बिघाड होता तो तातडीने दुरुस्त करण्यात आला असुन यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेण्यात आली आहे तर पालिका आयुक्तांनी देखील सूचना दिल्या असल्याच महापालिका उपायुक्त संदिप माळवी यांनी सांगितले. 

Byte - संदिप माळवी ( उपायुक्त,ठामपा )
Byte - अविनाश जाधव ( अध्यक्ष, मनसे ठाणे जिल्हा ) 
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.