ठाणे - कुटुंब लग्न समारंभासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांच्या घराच्या खिडकीची ग्रील वाकवून अज्ञात चोरट्यांनी रुममधील एक तोळा सोने, एक मोबाईल आणि साडेसात लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील आकाश कॉलनी रोडजवळ घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आकाश कॉलनी रोडजवळ मनीष इसरानी कुटूंबासह राहतात. गुरुवारी इसरानी हे त्यांच्या कुटुंबासह एका नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी बाहेर गावी गेले होते. घर बंद असल्याचा फायदा घेत, काही अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरातील खिडकीची ग्रील वाकवून घरात प्रवेश केला. यात एक तोळा सोने, एक मोबाईल आणि साडेसात लाखांची रोख रक्कम लंपास केली. आज मनीष इसरानी यांचे कुटुंब लग्नावरून घरी आले असता, त्यांच्या घरी चोरी झाल्याचे समजले.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस उपआयुक्त विनायक नराळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन खंदारे करत आहेत.
हेही वाचा -
निर्भया प्रकरण : दोषी पवन कुमार गुप्ताने दाखल केली 'क्युरेटिव' याचिका
प्रमुख आठ क्षेत्रांच्या वृद्धीदरात सुधारणा; जानेवारीत २ टक्क्यांची नोंद