ETV Bharat / city

कोंडी व वाढत्या अपघातांच्या निषेधार्थ मुंब्रा बायपासवर राष्ट्रवादीचा रास्ता रोको - thane ncp agitation in traffic issue'

मुंब्रा बायपासवरील वाहतूक कोंडीमध्ये वाढ, वाढते अपघातांचे प्रमाण या प्रश्नावर ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंब्रा वाय जंक्शन येथे रास्तारोको आंदोलन केले. या वेळी बेजबाबदार कारभाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर हत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

rasta-roko-agitation-on-mumbra-bypass-in-protest-of-traffic-congestion-and-increasing-accidents
कोंडी व वाढत्या अपघातांच्या निषेधार्थ मुंब्रा बायपासवर राष्ट्रवादीचा रास्ता रोको
author img

By

Published : Dec 14, 2019, 7:49 PM IST

ठाणे - अनेक दिवसांपासून वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात येत नाही आहे. त्यामुळे मुंब्रा बायपासवरील वाहतूक कोंडीमध्ये वाढ होत आहे, शिवाय अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा वाय जंक्शन येथे रास्ता रोको आंदोलन छेडले. या बेजबाबदार कारभाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर हत्येला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

कोंडी व वाढत्या अपघातांच्या निषेधार्थ मुंब्रा बायपासवर राष्ट्रवादीचा रास्ता रोको

हेही वाचा - 'किरीट सोमैयांना सध्या काहीच काम नाहीये'

मुंब्रा बायपासवरील अवजड वाहनांची संख्या सध्या वाढीस लागली आहे. वास्तविक पाहता, रात्रीच्या वेळी या मार्गावरून अवजड वाहने सोडण्याचे जाहीर करण्यात आलेले असताना दिवसाही ट्रक, ट्रेलर्स आदी वाहने सोडली जात आहेत. त्यामुळे मुंब्रा-कोसा, दिवा, शिळ आदी भागात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढीस लागले आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादीने रास्ता रोको केले. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा - पंकजा मुंडे, खडसेंचा विषय काढताच फडणवीसांनी जोडले हात

यावेळी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, ‘गेल्या काही वर्षांत या मार्गावर 150 लोक मृत्युमुखी पडले आहेत. हा रस्ता म्हणजे मृत्युचा सापळा झाला आहे. येथे येणारे ट्रक्स हे न यायच्या वेळेतच येत आहेत. न येण्याच्या वेळेत ते येण्यामागे आर्थिक कारण आहे. जर, नियमानुसार दुपारी अवजड वाहने सोडायची आहेत. तर, सकाळी साडे नऊ वाजता हे ट्रक्स येतातच कसे? येथे अपघात होतोच कसा? ही अवजड वाहने सोडली जातातच कशी? या अपघातांची जबाबदारी पोलीस अधिकारी घेणार आहेत की नाही, हा खरा प्रश्न आहे. लोकांचे जीवन ऐवढे स्वस्त नाही की, ट्रकखाली मरावे. त्यामुळे या सर्व प्रकाराला जो अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कलम 304 अन्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केली.

Intro:कोंडी व वाढत्या अपघातांच्या निषेधार्थ मुंब्रा बायपासवर राष्ट्रवादीचा रास्ता रोकोBody:

गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात येत नाही. त्यामुळे मुंब्रा बायपासवरील वाहतूक कोंडीमध्ये वाढच होत आहे. शिवाय, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा वाय जंक्शन येथे रास्ता रोको आंदोलन छेडले.या बेजबाबदार कारभाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर हत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करावा.अशी मागणी आंदोलकांनी केली.
मुंब्रा बायपासवरील अवजड वाहनांची संख्या सध्या वाढीस लागली आहे. वास्तविक पाहता, रात्रीच्या वेळी या मार्गावरुन अवजड वाहने सोडण्याचे जाहीर करण्यात आलेले असतानाही दिवसाही ट्रक, ट्रेलर्स आदी वाहने सोडली जात आहेत. त्यामुळे मुंब्रा- कोौसा, दिवा, शिळ आदी भागात वाहतू कोंडी तर होतच आहे. शिवाय,अपघातांचे प्रमाणही वाढीस लागले आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादीने रास्ता रोको केला.यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करुन सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
यावेळी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, ‘ गेल्या काही वर्षांत या मार्गावर 150 लोक मृत्युमुखी पडले आहेत. हा रस्ता म्हणजे मृत्युचा सापळा झाला आहे. येथे येणारे ट्रक्स हे न यायच्या वेळेतच येत आहेत. न येण्याच्या वेळेत ते येण्यामागे आर्थिक कारण आहे. जर, नियमानुसार दुपारी अवजड वाहने सोडायची आहेत. तर, सकाळी साडे नऊ वाजता हे ट्रक्स येतातच कसे? येथे अपघात होतोच कसा? ही अवजड वाहने सोडली जातातच कशी? या अपघातांची जबाबदारी पोलीस अधिकारी घेणार आहेत की नाही, हा खरा प्रश्न आहे. लोकांचे जीवन ऐवढे स्वस्त नाही की ट्रकखाली मरावे. त्यामुळे या सर्व प्रकाराला जो अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर भादंवि 304 अन्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केली.
Byte जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस नेतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.