ETV Bharat / city

Mumbai-Nashik highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला दुचाकीवरील तरुणाचा बळी - Mumbai Nashik highway

मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांनी एका दुचाकीवर पाठीमागे बसललेल्या तरुणाचा बळी गेल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजनोली पूलाजवळ घडली आहे. याठिकाणी खड्ड्यात दुचाकी गेल्याने तोल जाऊन रस्त्यावर पडलेल्या या पाठीमागे बसललेल्या तरुणाच्या अंगावरून डम्पर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे
मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे
author img

By

Published : Jul 25, 2022, 3:04 PM IST

ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांनी एका दुचाकीवर पाठीमागे बसललेल्या तरुणाचा बळी गेल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजनोली पूलाजवळ घडली आहे. याठिकाणी खड्ड्यात दुचाकी गेल्याने तोल जाऊन रस्त्यावर पडलेल्या या पाठीमागे बसललेल्या तरुणाच्या अंगावरून डम्पर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात डम्पर चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ब्रिजेशकुमार जैस्वार उर्फ मुनी काका असे मृत दुचाकीस्वराचे नाव असून तो उल्हासनगरमध्ये राहणारा होता.

खड्ड्यात दुचाकी आदळल्याने रस्त्यावर पडले - मृतक ब्रिजेशकुमार आणि त्याचा मित्र जनकराम शर्मा (वय २२) हे दोघे शनिवारी भिवंडी येथील मानकोली भागातील पारसनाथ कंपाऊंड येथे कामानिमित्ताने दुपारच्या सुमारास दोघेही दुचाकीवरून पारसनाथ कंपाऊंड येथे आले. त्यानंतर कामे आटोपून उल्हासनगरमध्ये घरी परतत असताना त्यांची दुचाकी रांजनोली नाका येथे आली. मात्र, वाहतूक अतिशय संथ सुरू होती. त्यामुळे दुचाकीचालक रामजनक हा दुचाकी काहीशी मुख्य रस्त्याच्या खाली घेऊन चालवत होता. त्याचवेळी महामार्गावरील एका खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळल्याने दोघेही दुचाकीवरून रस्त्यावर खाली पडले असता तेवढ्यात मुंबईहून नाशिककडे भरधाव डम्परखाली पाठीमागे बसललेला ब्रिजेशकुमार आल्याने डंपरच्या चाकाखाली येऊन चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

चालक घटनास्थळावरुन फरार - तर अपघात घडताच चालक घटनास्थळावरुन फरार झाला. या अपघाताची नोंद कोनगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून फरार डंपर चालकाचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत. दुसरीकडे खड्यामुळे नागरिकांचे बळी जात असल्याने संबधित विभाग मात्र गांभीर्यांने खड्डे दुरुस्तींकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

हेही वाचा - जालनामध्ये शिवसेनेला भगदाड; अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.