ETV Bharat / city

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधितांचा सिडकोसमोर मुक्काम मोर्चा

अखिल भारतीय किसान सभा व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीच्या माध्यमातून विमानतळ भागातील बाधित नागरिकांनी सिडको भवनाच्या समोर मुक्काम मोर्चा काढला आहे.

navi mumbai airport news
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बधितांचा मुक्काम मोर्चा
author img

By

Published : Dec 25, 2019, 7:18 PM IST

Updated : Dec 25, 2019, 7:49 PM IST

नवी मुंबई - अखिल भारतीय किसान सभा व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीच्या माध्यमातून विमानतळ भागातील बाधित नागरिकांनी सिडको भवनाच्या समोर मुक्काम मोर्चा काढला आहे. मागण्या पूर्ण न होईपर्यंत या ठिकाणी ठिय्या देणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. सिडकोच्या माध्यमातून न्याय मिळत नाही; तोपर्यंत हा मोर्चा सुरुच राहील, असा इशारा या प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधितांचा सिडकोसमोर मुक्काम मोर्चा

शून्य पात्रता व अपात्र पध्दत बंद करून सरसट सर्वांना पुनर्वसन पॅकेज लागू करावे, ही महत्त्वाची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. तसेच संबंधित मागण्या पूर्ण न होईपर्यंत सिडकोने बांधकामे न तोडण्याचे आवाहन त्यांनी केले.

कालपासून(दि.24डिसें) या प्रकल्पग्रस्तांचा मुक्काम सिडको भवनासमोर असून त्यांनी याच ठिकाणी संसार मांडला आहे.

अनेक महिला या ठिकाणी चुली पेटवून स्वयंपाक करत आहेत. सर्व मागण्यांची पूर्तता होईपर्यंत याच ठिकाणी मुक्काम मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हीच स्थिती कायम राहील असाही ईशारा प्रकल्पग्रस्तांनी सिडको प्रशासनाला दिला आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या

विमानतळामुळे बाधीत झालेल्या मच्छीमार व्यावसायिकांना 2013 च्या कायद्यानुसार नुकसानभरपाई मिळणे

प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देऊन 18 वर्षांवरील युवक-युवतींना नोकरी देणे

प्रकल्पग्रस्तांचे घर बांधून पूर्ण होत नाही, तोपर्यंत बाजारभावाप्रमाणे घरभाडे मिळावे

अ.ब.क.ड. घरांचे स्वतंत्र प्लॉट, घर भाडे, निर्वाह भत्ता, कृषी मजुरी, स्वतंत्र कुटुंब म्हणून वाटप करावे

बांधकाम खर्च अडीच हजार रुपये मिळणे

Intro:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बधितांचा मुक्काम मोर्चा..

सिडको भवनाच्या समोर केला मुक्काम.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत करणार मुक्काम...

नवी मुंबई:

अखिल भारतीय किसान सभा यांच्या माध्यमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीच्या माध्यमातून मुक्काम मोर्चा काढण्यात आला असून जोपर्यंत सिडकोच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळतं नाही तोपर्यंत हा मोर्चा सुरूच राहील असे विमानतळ बाधीत प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंधितांनी सिडको भवनाच्या समोर मुक्काम मोर्चा काढला असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा मुक्काम इथून हलविणार नाही असा ईशारा विमानतळ बाधीत गावातील प्रकल्प ग्रस्तांनी दिला आहे.
शून्य पात्रता व अपात्र पध्दत बंद करून सरसट सर्वांना पुनर्वसन पॅकेज लागू करणे. जो पर्यत सिडकोच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडावीत नाही तोपर्यंत सिडकोने प्रकल्पग्रस्तांचे कोणतेही बांधकाम न तोडणे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधीत झालेल्या मच्छीमार व्यावसायिकांना २०१३ च्या कायद्यानुसार नुकसानभरपाई मिळणे.
विमानतळामुळे बाधित प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देऊन १८ वर्षावरील युवक-युवतींना युवक युवतींना नोकरी उपलब्ध करून देणे. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे घर बांधून पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना बाजारभावाप्रमाणे घरभाडे मिळावे.
अ. ब.क.ड. घरांचे स्वतंत्र प्लॉट, घर भाडे,निर्वाह भत्ता,कृषी मजुरीचे, स्वतंत्र कुटुंब म्हणून वाटप करावे
साडेबारा टक्क्याचे त्वरित वाटप होणे व
बांधकाम खर्च अडीच हजार रुपये मिळणे या मागण्यांचा यात समावेश आहे. काल पासून या प्रकल्पग्रस्तांचा मुक्काम सिडको भवनासमोर असून त्यांनी तिथेच चुलीही पेटवून आपले अन्न शिजवले आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हीच स्थिती कायम राहील असाही ईशारा प्रकल्पग्रस्तांनी सिडको प्रशासनाला दिला आहे.

बाईट्स
रामचंद्र म्हात्रें अखिल भारतीय किसान सभा अध्यक्ष
इतर बाईट्स प्रकल्पग्रस्त महिलांचे आहेत.

Body:.Conclusion:.
Last Updated : Dec 25, 2019, 7:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.