ठाणे - डोंबिवली अल्पवयीन मुलीवर झालेल्या गँगरेप प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. यातील आरोपींना कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक झाली आहे. ठाण्यात पोस्टरद्वारे हा संताप व्यक्त करण्यात आला आहे.
एकूण 33 जण
एका 15 वर्षीय मुलीला तिच्याच प्रियकराने तिचे अश्लील व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देत अनेक जणांसोबत शय्यासोबत करण्यास भाग पाडल्याच्या या घटनेने संपूर्ण राज्याची मान शरमेने खाली गेली आहे. एकूण 33 जणांची नावे या प्रकरणात स्वतः पीडित मुलीने पोलिसांना सांगत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अत्यंत आक्रमक झाली असून त्यांनी ठाण्यातील अनेक ठिकाणी या नराधमांची निंदा करणारे फलक लावले आहेत.
ठोस भूमिकेची गरज
या सर्व नराधमांना एका महिन्यात फाशी द्यावी अन्यथा या सर्वांचे गुप्तांग कापावे, अशी मागणी मनसे नेते महेश कदम यांनी केली. मनसेने याआधीही कल्पिता पिंपळे हल्ला प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, आता सरकारने ठोस भूमिका घेऊन कठोर कारवाई करून दाखवावी, अशी मागणी होत आहे.