ETV Bharat / city

Kushivali Dam Scam : कुशिवली धरण भूसंपादन घोटाळा; आतापर्यंत ४३ आरोपींना अटक, माजी सभापतीच्या पतीलाही अटक - माजी सभापतींचे पती प्रवीण भोईर

अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरणाच्या भू संपादनात कोट्यवधी (Billions in Land Acquisition Scam) रुपयांच्या घोटाळ्यात (Kushivali Dam Land Acquisition Scam) आतापर्यंत तब्बल ४३ आरोपींना अटक करण्यात आली (43 Accused Arrested in Scam) आहे. धक्कादायक म्हणजे शिवसेना पक्षाच्या अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापतींचे पती प्रवीण भोईरला अटक (Praveen Bhoir Arrested) केल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. तर या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार शासकीय मोठे अधिकारी (Chief Facilitator, Senior Government Official) असल्याची शक्यतादेखील तपास अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Kushivali Dam Land Acquisition scam
कुशिवली धरण भूसंपादन घोटाळ
author img

By

Published : Jun 7, 2022, 10:58 PM IST

ठाणे : अंबरनाथ तालुक्यातील प्रस्तावित कुशिवली धरणाच्या भू संपादनात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात आतापर्यंत तब्बल ४३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे शिवसेना पक्षाच्या अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापतींचे पती प्रवीण भोईरला अटक केल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. तर या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार शासकीय मोठे अधिकारी असल्याची शक्यतादेखील तपास अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

मधुकर कड

घोटाळ्यातील आरोपींना न्यायालयात आणले : या घोटाळ्याप्रकरणी एकूण पाच वेगवेगळे गुन्हे उल्हासनगर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दाखल झाले असून, आरोपींची संख्या आणखी वाढणार आहे. या प्रकरणात निवृत्त नायब तहसीलदर मोहन किस्मतराव यालादेखील १० दिवसांपूर्वीच अटक केली आहे. तर अंबरनाथ तालुक्यातील काही राजकीय नेत्यांचादेखील सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या सर्व ४३ आरोपींना उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केले असता, सगळ्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.

Kushivali Dam Land Acquisition
कुशिवली धरण भूसंपादन

गुन्ह्याची व्याप्ती मोठी : या घोटाळ्याची वाढणारी व्याप्ती पाहता राज्य सरकारने यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. ज्या अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली गावात धरण बांधले जाणार आहे, त्यासाठी जमीन संपादन करताना मूळ जागा मालक असलेल्या शेतकऱ्यांच्या जागी बोगस व्यक्ती उभी करून कोट्यवधींचा जमिनीचा मोबदला परस्पर लाटण्यात आला आहे.

हेही वाचा : Ujani Dam Issue : उजनीचे पाणी नेमकं कोणी पळवलं?; वाचा, काय आहे प्रकरण...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.