ठाणे गणेश चतुर्थीपासून बाप्पाची मनोभावे पूजा-अर्चा करून लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी कल्याणमधील कचोरे कोळीवाडा येथे खाडीकिनारी असलेल्या विसर्जन स्थळाकडे जाण्यासाठी गणेशभक्त जीवाची परवा न करता रेल्वे रूळ ओलांडून खाडीत गणरायाला निरोप देत असल्याचे चित्र दिसून आले.
विशेष म्हणजे परतीचा प्रवास करताना बाप्पांना देखील रेल्वे रूळ ओलांडून आपले स्थान गाठावे लागल असे तरी, या भागात महापालिकेच्या वतीने ३ कृत्रिम तलाव पालिका प्रशाशनाकडून उभारण्यात आले. मात्र, भाविक या तलावत बाप्पाचे विसर्जन न करता स्वतःसह कुटूंबाचा जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून खाडीत गणरायाला निरोप देत आहेत.
कल्याण पूर्वेतील पत्रीपूल - कचोरे परिसरात दरवर्षी ४ ते ५ हजार गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. कल्याण आणि ठाकुर्लीच्या दरम्यान असलेल्या कचोरे येथील विसर्जन घाटावर बाप्पाचे विसर्जन करण्यात येते. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते. दरवर्षी रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालून विसर्जन घाटावर जावे लागत असल्याने दोन वर्षांपूर्वी स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी कृत्रिम तलाव उभारण्याबाबत पालिकेकडे मागणी केली होती. त्यांच्या मागणी नुसार कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने तीन कुत्रिम तलाव यंदाच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी उभारले आहेत.
दीड दिवसापासून गौरी गणपती आणि अनंत चतुर्थीच्या विसर्जनादिवशी या ठिकाणी स्थानिक मंडळ आणि आरपीएफच्या जवानांच्या मदतीने गणेश भक्तांनी व्यवस्थितरित्या विसर्जन पार पाडले. बाप्पाला देखील आपला परतीचा प्रवास करताना रेल्वे रूळ ओलांडावा लागला. त्यामुळे बाप्पा भक्तांना सुबुद्धी दे अशीच प्रार्थना करण्याची वेळ प्रशासनावर आल्याची दिसून आले.