ETV Bharat / city

शिवसेनेला मोठा धक्का! ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील ५५ नगरसेवकही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील - Kalyan Dombivali Corporetor

कल्याण डोंबिवलीतील ( Kalyan Dombivali ) तब्बल ५५ नगरसेवकांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर ( 55 Corporetor Joint Eknath Shinde Group ) केल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. यातले काही नगरसेवक हे बाहेरगावी आहेत तर काहींची प्रकृती खराब असल्यामुळे ते यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत. तरी अशा सर्व नगरसेवकांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

55 Corporetor Joint Eknath Shinde Group
55 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामील
author img

By

Published : Jul 8, 2022, 1:04 PM IST

Updated : Jul 8, 2022, 1:37 PM IST

ठाणे - एकनाथ शिंदे यांनी मुंख्यमंत्री ( CM Eknath Shinde ) पदाचा कार्यभार घेताच ठाणे नंतर नवी मुबंईतील सेना नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील ( Corporetor Joint Eknath Shinde Group ) झाले आहेत. आता कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांनीही काल रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत हम तुम्हारे साथ है या घोषणा देत पाठींबा जाहीर केला. यामध्ये सुमारे ५५ नगरसेवक आणि शिवसेनेचे काही वरिष्ठ पदाधिकारीही असल्याची माहिती आहे.

55 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामील

कल्याण - डोंबिवलीतील ५५ नगरसेवकांचा पाठिंबा जाहीर - ठाणे महानगपालिकेच्या ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन ( Thane 55 Corporetor Joint Eknath Shinde Group ) देऊन काही तासही उलटले नसताना शिवसेनाचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील ( Kalyan Dombivali ) तब्बल ५५ नगरसेवकांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर ( 55 Corporetor Joint Eknath Shinde Group ) केल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तसेच काही नगरसेवक हे बाहेरगावी आहेत तर काही प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावेळी उपस्थित राहू शकले नसले तरी अशा सर्व नगरसेवकांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शासकीय निवासस्थानी घेतली भेट - मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी या सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली ( Visit official residence ). दरम्यान यावेळी उपस्थित नगरसेवक पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द असून हा विकास रथ प्रगतीपथावर नेण्याचे स्वप्न आपण पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

ठाण्यातील ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील - ठाणे महानगपालिकेच्या ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देत शिंदे गटात सामील झाले आहे. यामध्ये माजी महापौर नरेश म्हस्के यांचा देखील समावेश आहे. बुधवारी नगरसेवकांनी मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाण्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.

नवी मुंबईतील ३२ नगरसेवकांचा शिंदे गटात पाठिंबा - नवी मुंबईतील ३२ नगरसेवकांनी गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहिर केला. "आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. त्यांनी कधीच कुणाचा फोन कट केला नाही. पक्षाचा सामान्य कार्यकर्तासुद्धा त्यांना कॉल करू शकतो आणि ते फोन उचलतात." असे या सरेव नगरसेवकांनी म्हलटे. नवी मुंबई महानगरपालिकेत ३७ नगरसेवक असून त्यापैकी ३२ जणांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray Led Faction : एकनाथ शिंदेंच्या सरकार स्थापनेविरोधात उद्धव ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयात धाव

Last Updated : Jul 8, 2022, 1:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.