ठाणे : शुल्लक वादातून एका ४५ वर्षीय आरोपीने शेजारी राहणाऱ्या कुटुंबावर चाकूने हल्ला करीत दोघांची हत्या केली. तर याच कुटुंबातील चौघा माय - लेकांवरही चाकूने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटनाही घडली आहे. ही घटना गैबीनगर मधील खान कंपाऊंड परिसरात असलेल्या खान चाळीत घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येसह गुन्हा दाखल करण्यात येऊन हल्लेखोराला अटक केली आहे.
मोहंमद अन्सारुलहक मोहंमद लुकमान अन्सारी वय (४५ ) असे दुहेरी हत्याकांडात अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव असून कमरुजमा अन्सारी (वय ४२) आणि इम्तियाज मो. जुबेर खान (वय ३५) असे हत्या झालेल्या दोघांचे नावे आहेत. तर मृत झालेल्या अन्सारींची पत्नी हसीना (वय ३६) आरीबा वय १६) रेहान (वय १५) हफ़िफ़ा (वय ११) हे जखमी झाले आहेत.
यामुळे घडले हत्याकांड
भिवंडीतील गैबीनगर भागातील खान कंपाउंड परिसरात हल्लेखोर व अन्सारी कुटूंब समोरच एका चाळीत राहतात. काही दिवसापूर्वी मृताची पत्नी हसीनाने हल्लेखोराला 'भाइयों का फुकटका खाता है. और लोगो को परेशान करता है' असा टोमणा मारला होता. याचाच राग मनात धरून आज (शुक्रवारी) हल्लेखोराने कमरुजमा अन्सारी यांच्या घराबाहेर उभा असताना त्याच्यावर चाकूने हल्ला केला. हल्लेखोर चाकूने हल्ला करताना शेजारी राहणारा इम्तियाजने मध्यस्थीस आला. हे पाहून हल्लेखोराने त्याच्यावरही चाकूने वार केले. यावेळेस पत्नी हसीना व इतर तिघे मध्ये आले असता त्यांनाही जखमी केले.
आरोपीला घेतलं ताब्यात
घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दखल झाले. मात्र परिसरात तणावाचे वातावरण असल्याचे पाहून अधिक पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेळके, पोलीस हवालदार प्रसाद काकड, किरण जाधव , श्रीकांत पाटील, अमोल इंगळे, रवी पाटील या पोलीस पथकाने आरोपीला पोलीस ठाण्यात आणले. हल्लेखोर हा परिसरातील एका मशिदीसाठी देगणी जमा करण्याचे व त्याचा हिशेब ठेवण्याचे काम करत होता. तर घटनस्थळी पोलिसांनी पंचनामे केले. आणि दोघाचे मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात रवाना केले. तर जखमींना याच रुग्णालयात उपचार सुरु आहे. या दुहेरी हत्याकांडाचा अधिक तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - Pune Crime : सहायक पोलीस निरीक्षकाचा पोलीस उपनिरीक्षक महिलेवर अनैसर्गिक अत्याचार