ठाणे (नवी मुंबई) -कोरोना काळात तोंडाला मास्क लावणे फार महत्त्वाचे आहे. मात्र, बऱ्याचदा हा मास्क लावण्यासाठी नागरीक विसरतात. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या माध्यमातून सेल्फी अभियानाचे आयोजन करण्यात आले. त्यातून मास्कचा वापर करण्यासाठी जनजागृतीही करण्यात आली.
कोरोना काळात कोरोना पसरू नये म्हणून तोंडाला मास्क, फेस शिल्ड अशा गोष्टींचा वापर न केल्यास शिंकल्यावर किंवा खोकल्यावर नाका तोंडातून निघणारे सूक्ष्म कण 25 फुटांपर्यंत पोहोचू शकतात. ही गळती रोखण्यासाठी 6 फुटांचे अंतर पण तेवढेच महत्वाचे आहे. तोंडाला मास्क घातल्यानंतर शिंकल्यावर आणि खोकल्यावर सूक्ष्म कण पसरणार नाहीत. त्यामुळे मास्क लावणे गरजेचे आहे. नवी मुंबई शहरात मास्क लावण्यासंबधी आम आदमी पक्षाच्या माध्यमातून सेल्फी अभियान राबविण्यात येत आहे.
हातात बोर्ड देऊन नागरिकांचे काढले जातात सेल्फी
मास्क न लावलेल्या व मास्क विसरलेल्या लोकांमध्ये नवी मुंबई शहरात आम आदमी पक्षाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मी नवी मुंबईचा हिरो, माझे कुटूंब माझी जबाबदारी अशा आशयाचे बोर्ड नागरिकांच्या हातात दिले जातात. विनामास्क असलेल्या नागरिकांना मास्क देऊन त्यांचे सेल्फी काढण्यात येतात.
नवी मुंबई: मास्क वापरण्याकरता सेल्फी अभियानातून आम आदमी पक्षाची जनजागृती
तोंडाला मास्क घातल्यानंतर शिंकल्यावर आणि खोकल्यावर सूक्ष्म कण पसरणार नाहीत. त्यामुळे मास्क लावणे गरजेचे आहे. नवी मुंबई शहरात मास्क लावण्यासंबधी आम आदमी पक्षाच्या माध्यमातून सेल्फी अभियान राबविण्यात येत आहे.