ETV Bharat / city

Thane Crime News : वजनकाट्याला इलेक्ट्रॉनिक चीप लावून कोट्यवधींची फसवणूक; २ कोटींचा मुद्देमाल केला जप्त - Manpada Police arrests 7 accused

कल्याण डोंबिवलीत स्मार्ट सिटीच्या नावाने हजारो गृहसंकुल उभी राहत आहेत. त्यातच बांधकाम व्यावसायीक मनिष नरेश पमनानी यांनी स्टील कंपनीला ४७ टनची आर्डर दिली होती. मात्र दुसऱ्या वजनकाट्यावर स्टीलचे वजन केले असता ५ टन स्टील कमी दाखवत होते. त्यामुळे त्यांनी ९ मे रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन ५ टन स्टीलचे अपहार झाल्याची तक्रार दिली. ( 7 accused cheated crores of rupees)

Manpada Police arrests 7 accused
7 जणांना पोलिसांनी अटक केली
author img

By

Published : May 23, 2022, 5:55 PM IST

Updated : May 23, 2022, 6:02 PM IST

ठाणे - इमारत बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टीलचा कोट्यवधीचा अपहार करुन बांधकाम व्यावसायिक व स्टील व्यापाऱ्यांची फसवणुक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला. मानपाडा पोलिसांना ( Thane Manpada Police Station ) ही कामगिरी केली आहे. खळबळजनक बाब म्हणजे वजनकाट्याला इलेक्ट्रॉनिक चीप लावून रिमोटव्दारे स्टीलचे वजन वाढविणाचा गोरखधंदा ही टोळी करत होती. या टोळीत इलेक्ट्रॉनिक इंजिनियरचा सहभाग असल्याचे समोर आले. या टोळीकडून आतापर्यत २ कोटी ८ लाखांच्यावर मुद्देमाल जप्त करून टोळीतील ७ आरोपीना अटक केली आहे. ( Manpada Police arrests 7 accused )

पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ यांची प्रतिक्रिया

५ टन स्टीलचे अपहार केल्याचे आले समोर - कल्याण डोंबिवलीत स्मार्ट सिटीच्या नावाने हजारो गृहसंकुल उभी राहत आहेत. त्यातच बांधकाम व्यावसायीक मनिष नरेश पमनानी यांनी स्टील कंपनीला ४७ टनची आर्डर दिली होती. मात्र दुसऱ्या वजनकाट्यावर स्टीलचे वजन केले असता ५ टन स्टील कमी दाखवत होते. त्यामुळे त्यांनी ९ मे रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन ५ टन स्टीलचे अपहार झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी भादवि, कलम ४२०, ४६५, ४६८, ४०७, ३४ सह १२०(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरु केला. गुन्ह्याची पार्श्वभुमी पाहता आरोपी हे स्टीलचे मोजमाप करण्यासाठी असलेल्या वजनकाटयाला इलेक्ट्रॉनिक चीप लावुन, रिमोटव्दारे आलेल्या मालाचे वजन वाढविण्याचे काम करत असल्याचे तपासात समोर आले.

जालनामधील भंगार व्यावसायिकाला लोखंडाची विक्री - स्टील कंपनीकडून बांधकाम व्यावसायिकांकडे आलेले स्टील हे ट्रान्सपोर्ट कंपनीचे चालक व मालक यांना हाताशी धरुन कंपनीतून स्टीलचा माल निघाला. त्यानंतर त्यातील काही माल जालना शहरातील भंगार व्यावसायिकाला विकुन उर्वरीत माल हा वजनकाट्यावर आणला. यावेळी रिमोट कंट्रोलद्वारे मालाचे वजन वाढवून कमी प्रमाणात स्टील बांधकाम व्यावसायिक यांना पुरवुन स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेत असल्याचे आढळून आले आहे.

Manpada Police arrests 7 accused
7 जणांना पोलिसांनी अटक केली

अथक प्रयत्नानंतर टोळीतील ७ आरोपीना अटक - या गुन्ह्यात महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यात अशा प्रकारचे गुन्हे अटक आरोपींनी केल्याची शक्यता आहे. त्यामुळे गुन्ह्याचा तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली चालु करण्यात आला आहे. तपासात केलेल्या अथक प्रयत्नानंतर टोळीतील आरोपी नितीन दत्ता चौरे ( वाहन चालक, रा. दस्तापुर, जि.वाशिम), दिदिारसिंग मंगलसिंग राजु ( वाहन मालक रा. विक्रोळी,मुंबई) दिलबागसिंग हरबन्ससिंग गिल ( वाहन मालक व चालक ) रा. विक्रोळी, मुंबई, मुंब्रातील फिरोज मेहबुब शेख ( इलेक्ट्रॉनिक चीप बसविणारा ), शिवकुमार उर्फ मिता गिलई चौधरी ( स्टील विकतघेणारा ) हरविंदरसिंग मोहनसिंग तुन्ना (गाडी मालक रा. विक्रोळी पुर्व) हरजिंदरसिंग बलबीरसिंग राजपुत (चालक, रा. मजिठा, ता.जि.अमृतसर, पंजाब) अश्या ७ आरोपीना अटक करण्यात आली आहे.

इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर फरार - इलेक्ट्रॉनिक चीप लावणारा इंजिनिअर फरार असुन त्याचा शोध सुरु असल्याची माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली आहे. तर फरार आरोपीने भारतभर कोठे कोठे चीप लावलेल्या आहेत. याचा तपास करण्यात येणार आहे. तसेच अटक आरोपी फिरोज मेहबुब शेख याच्यावर भंगार चोरीचे यापुर्वी ६ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अटक आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी जालना येथील भंगार व्यावसायिकाला अपहार केलेले स्टीलची विक्री केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

२ कोटी ८, लाख १ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त - या गुन्ह्यातील एकूण २ कोटी ८, लाख १ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्ती केल्यामध्ये मालवाहु ट्रक, १२ टन स्टील, इलेक्ट्रॉनिक चीप, रिमोट, मोबाईल फोन असा मुद्देमाल आहे.

हेही वाचा - Pune Temple Dargah Controversy : पुण्यात 'त्या' दोन मंदिरांच्या ठिकाणी दर्गाच! इतिहास संशोधकाचा दावा

Last Updated : May 23, 2022, 6:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.