ETV Bharat / city

Investors Cheated In Thane : गुंतवणुकीवर जास्त व्याजदराचे आमिष दाखवून १०५ गुंतवणूकदारांची १८ कोटी रुपयांची फसवणूक.. संचालिका अटकेत

कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्त व्याज मिळेल असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक ( Investors Cheated In Thane ) करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली ( Woman Director Arrested In Cheating Case ) आहे. या महिलेने १०५ गुंतवणूकदारांची १८ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

author img

By

Published : Mar 22, 2022, 10:32 PM IST

गुंतवणुकीवर जास्त व्याजदराचे आमिष दाखवून १०५ गुंतवणूकदारांची १८ कोटी रुपयांची फसवणूक.. संचालिका अटकेत

ठाणे: आमच्या वित्तीय संस्थेत गुंतवणूक केल्यास मिळणाऱ्या नफ्यातून गुंतवणूकदाराला वाढीव व्याज दिले जाईल, असे खोटे आमिष गुंतवणूकदारांना दाखवुन १०५ गुंतवणूकदारांची १८ कोटी रुपयांची फसवणूक ( Investors Cheated In Thane ) करणाऱ्या वित्तीय संस्थेच्या संचालिकेला कोळसेवाडी पोलिसांनी औरंगाबाद येथून सोमवारी अटक ( Woman Director Arrested In Cheating Case ) केली. मनीषा सरोदे अटक केलेल्या संचालिकेचे नाव आहे. या महिलेची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

दोन वर्षापासून फरार

१०५ गुंतवणूकदारांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात ( Kolasewadi Police Station ) तीन वर्षापूर्वी वर्षापूर्वी सरोदे दांपत्यविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दोन वर्षापासून पोलीस आरोपींचा शोध घेत होते. पोलिसांनी सांगितले, कल्याण पूर्व भागात सुनील सरोदे आणि त्यांची पत्नी मनीषा सरोदे यांनी अल्टा लाईक केअर प्रायव्हेट लिमिटेड आणि यु एल सी प्रायव्हेट लिमिटेड गोट फार्मिंग एग्रो सर्विसेस या दोन कंपन्या सुरू केल्या होत्या. आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास मिळणाऱ्या नफ्यातून गुंतवणूकदारांना वाढीव व्याज दिले जाईल, असे खोटे आश्वासन सरोदे पती-पत्नीने रहिवाशांना दिले होते.

पती-पत्नी झाले होते फरार

त्यांचा विश्वास संपादन करून कल्याण, बदलापूर, डोंबिवली, अंबरनाथ परिसरातील १०५ गुंतवणूकदारांकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांपासून ते पुढे मोठ्या रकमेपर्यंत गुंतवणूका या दाम्पत्याने स्वीकारल्या. गुंतवणूकदारांना सुरुवातीला त्यांनी आकर्षक परतावा दिला. नंतर परतावा देण्यास त्यांनी टाळाटाळ सुरू केली. अनेक ग्राहकांनी मूळ रक्कम परत मागितली, ती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. ग्राहकांच्या संपर्कला प्रतिसाद देणे सरोदे पती-पत्नीने बंद केले. कल्याण पूर्व येथील कंपनीचे कार्यालय बंद करून सरोदे पती पत्नी फरार झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.