पंढरपूर - स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तान पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. या फुलसजावटीत रुक्मिणी मातेला पैठणी नेसवण्यात आली असून गळ्यात तिरंगी उपरणे घालण्यात आले आहे. भगव्या, पांढऱ्या आणि हिरव्या पानांनी व फुलांनी केलेल्या सजावटीने विठ्ठल रुक्मिणीचे अनोखे रूप खुलून दिसत आहे.
हेही वाचा - सोलापुरात पंढरपूरसह पाच तालुक्यात संचारबंदी, संचारबंदीला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध
फुलांच्या सजावटीचे काम पुण्यातील श्रीमंत मोरया समुहाच्या वतीने करण्यात आले आहे. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने विठू-रखुमाईला तिरंगी फुलांच्या आरासामध्ये पाहून देशभक्ती आणि विठ्ठल भक्तीचा दुहेरी संगम अनुभवता आला. विठ्ठल व रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यातील ही फुलांची सजावट फारच सुंदर असून तिरंगी आरास कामासाठी शेवंती, कामिनी, झेंडूची फुले, तसेच तुळस यासह अन्य फुलांचा वापर करण्यात आला आहे. साधारणपणे 700 किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे विठू व रुक्मिणी मातेच्या मंदिरात स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने तिरंग्यातील अनुभूती पाहायला मिळाली.
हेही वाचा - Nag Panchami: सापाचा दूध पिल्याने मृत्यू होतो - सर्प अभ्यासक राहुल शिंदे