सोलापूर- भारतीय उद्योग क्षेत्रात सोलापूर टेक्सटाईल उद्योगाचा मोठा वाटा आहे. लॉकडाऊनमुळे या उद्योगाला घरघर लागली आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले होते की, सोलापुरातील टेक्सटाईल उद्योजकांकडून लष्कारासाठी किंवा केंद्रीय पोलिसांचा गणवेश शिवून घेतला जाईल. परंतु आजतागायत एकाही उद्योजकाला भारतीय लष्करी गणवेशाच्या ऑर्डर मिळाल्या नाहीत. मोदींचे ते आश्वासन म्हणजे सत्तेत येण्यासाठी निवडणूक काळातील केवळ एक राजकीय जुमला होता, अशी टीका आता होऊ लागली आहे.
तर कापड उद्योगाला चालणा मिळाली असती-
पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जर लष्करी गणवेशासाठी सोलापूरच्या टेक्साटाईल उद्योजकांकडून कापड खरेदी अथवा, गणवशेचा खरेदी केली असती तर आज लॉकडाऊन काळातही हे उद्योग तग धरून राहिले असते. सरकारकडून होणारी खरेदी ही खात्रीची आणि विश्वसनीय ठरते. मोदींना सोलापूर उद्योगाला दाखवलेले स्वप्न सत्यात उतरले असते तर या टेक्साटाईल उद्योगाचा कायापालट झाला असता, अनेकांच्या हाताला मिळणाऱ्या रोजगारात वाढ झाली असती. तसेच आज लॉकडाऊन काळात येथील उद्योजक आर्थिक संकटात सापडले नसते. मात्र, त्यांचे ते आश्वासन केवळ राजकीय जुमला होता, अशी भावना येथील उद्योजग आणि कामगारांमधून व्यक्त केली जात आहे.
दसरा दिवाळीत अनलॉक; पण व्यवसायाची भरभराटी डाऊनच-
दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन उठवण्यात आले. पण दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी ग्राहकांनी खरेदीच केल्या नाहीत. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी अनेक छोट्या व्यावसायिकांनी उदारीवर कापड खरेदी केली होती. त्यातच पुढील 4 महिने बाजारपेठा बंद झाल्यामुळे उलाढाल ठप्प होती. ग्राहकच नसल्याने नव्याने कापड उद्योजगतात माल खरेदीदार आलेच नाहीत. परिणामी कापड उद्योगांना आर्थिक घरघर सुरू झाली. पुढे केंद्र आणि राज्य सरकारने दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची नियमावली शिथिल केली. मात्र ग्राहकांनी पाठ दाखवल्याने व्यवसायात म्हणावी तशी भरभराट झाली नसल्याचे येथील व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
लहान कापड व्यावसायिकांना फटका-
अनेक कापड व्यावसायिकांनी आपल्या शोरूममध्ये माल भरला. तर काहींनी उदारीवर नवा कपडा मागविला, पण कापड खरेदीस भरघोस प्रतिसाद मिळाला नाही. कोरोनाचे सावट अद्याप दूर झाले नाही. त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत आरोग्य तज्ञांकडून दिले गेले. त्यामुळे ग्राहकांना अद्यापही पुन्हा लॉकडाऊन होण्याची भीती आहे. परिणामी कापड व्यावसायिकांना कापड व्यवसायिक ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे सोलापूरचा कापड उद्योग मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे.
कापड उद्योगात रिलायन्स उद्योग समूहाचा मोठा प्रभाव आहे. यांच्याकडून कृत्रिम धागे तयार करण्याचा कच्चा माल मिळते. पण या कंपनीने 20 ते 25 टक्के दर वाढविल्याने कापडाचे आणि टेक्सटाईल मालाचे दर वाढले आहेत. तसेच इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्याचे विजेचे दर अधिक आहेत. त्यामुळे देखील कापड विक्रीच्या दरांमध्ये फरक पडत आहे. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारकडून टेक्साटाईल उद्योगाला चालना देण्यासाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर करण्याची गरज आहे. 2003 ते 2004 या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर असताना सुशीलकुमार शिंदे यांनी टेक्सटाईल उद्योगाला पॅकेज जाहीर केले होते. मात्र, लॉकडाऊन काळात टेक्साटाईल उद्योग पूरता मोडकळीस आला आहे. मात्र, सरकारकडून या उदोग्यांना तारण्यासाठी अद्याप कोणतेही पॅकेज जाहीर झाले नसल्याची खंत व्यावसायिकांमधून व्यक्त केली जात आहे.
लॉकडाऊन काळात टेक्सटाईल कारखाने बंद; तरीही हजारोंची वीज बिले-
तबल 72 दिवस कडक लॉकडाऊन होते. येथील कारखाने पूर्णपणे बंद होते.लॉकडाऊन उठल्यावर वीज महावितरण महामंडळने सक्तीने लाईट बिल वसुली केली. जवळपास सोलापुरात 800 टेक्सटाईल कारखाने आहेत.2 कोटी 40 लाख रुपये येथील कारखानदारांनी वीज बिल भरले आहे.