सोलापूर - लोकशाहीत सर्वांना स्वातंत्र्य आणि शांततेने भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. सध्या शेतकऱ्यांचा निघालेला मोर्चा नाशिकमध्ये अडवला जात आहे, असे करणे म्हणजे सत्तेचा गैरवापर करण्यासारखे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले...
- जोपर्यंत आदीवासी असल्याचे प्रमाणपत्र धनगर समाजाच्या मुलांच्या हाती येत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टींना काही अर्थ नाही.- वंचित आघाडीवर सध्या भाष्य करू शकत नाही, त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे.- काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपाचा प्रश्न संपलेला आहे. आता प्रश्न इतर पक्षांचा आहे.- आमचे आयुष्य आरएसएसच्या विचारसरणीला विरोध करण्यातच गेले आहे. याबाबत आमची स्वच्छ भूमिका असून आरएसएसला सहानुभूती राहणार नाही.