ETV Bharat / city

कारगिल विजयदिनानिमित्त बंगळुरुचा 'श्रद्धा कलश' सोलापूरमार्गे दिल्लीला रवाना - Kargil Shraddha Kalash

बंगळुरुहुन दिल्लीला जाणारा श्रद्धा कलश आज सोलापूर मार्गे नवी दिल्लीला रवाना करण्यात आला.

सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी
author img

By

Published : Jul 24, 2019, 1:46 AM IST

सोलापूर - संपूर्ण भारतात दरवर्षी २६ जुलैला कारगिल विजय दिन साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर दरवर्षी बंगळुरुहून दिल्लीला जाणारा श्रद्धा कलश आज सोलापूर मार्गे नवी दिल्लीला रवाना करण्यात आला.

सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी

सिनियर सोसायटी ऑफ इंडियाची 21 सदस्यीय टीम, कॅप्टन निवृत्त एस. सी. भंडारी यांच्या नेतृत्वाखाली बंगळुरु ते नवी दिल्ली असा कारगिल श्रद्धा कलश घेऊन जात आहेत. प्रवासादरम्यान या श्रद्धा कलशाचे आज सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यावेळी सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी या कलशाचे स्वागत केले. यावेळी बनशेट्टी यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. तेव्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने कलशाला सलामी देण्यात आली. त्यानंतर हा श्रद्धा कलश सोलापूर रेल्वे स्थानकावर काही वेळासाठी ठेवण्यात आला. त्यावेळी उपस्थितांचे मन राष्ट्र अभिमानाने भरुन आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, मेजर शंकरराव खांडेकर, कॅप्टन उमाकांत कुलकर्णी, पोलीस अधिकारी महावीर सकाळी, अरुण पवार, राजेंद्र बहिरट, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयतील अनिल कुमार मेगंशेट्टी, कॅप्टन मार्तंड दाभाडे, सुभेदार मेजर संजीव काशीद, समीर आरकाटे, राजसाहेब शेख, चंद्रकांत साळुंके, दिनेश नागणे, गुरुनाथ कुलकर्णी, श्रीमती आशादेवी तावडे तसेच पोलीस कर्मचारी आणि एनसीसीचे विद्यार्थी आणि सैनिकी वस्तीगृहातील मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:सोलापूर : संपूर्ण भारतात दरवर्षी 26 जुलैला कारगील विजय दिन साजरा केला जातो.त्या पार्श्वभूमीवर दरवर्षी बेंगळुरूहुन दिल्लीला जाणारा श्रद्धा कलश आज सोलापूर मार्गे नवी दिल्लीला रवाना झाला.Body:सिनियर सोसायटी ऑफ इंडीयाची 21 सदस्यीय टीम, कॅप्टन निवृत्त एस.सी.भंडारी यांच्या नेतृत्वाखाली बेंगलोर ते नवी दिल्ली असा कारगिल श्रद्धा कलश घेऊन जात आहेत.सदर प्रवासादरम्यान हा श्रद्धा कलश आज सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन झाले.त्यावेळी
सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी या कलशाचं स्वागत केलं....यावेळी महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर पोलिस प्रशासनाच्या वतीने सलामी देण्यात आली.त्यानंतर हा श्रद्धा कलश सोलापू रेल्वे स्थानकावर कांही वेळासाठी ठेवण्यात आला.त्यावेळी उपस्थितांचं मन राष्ट्र अभिमानानं भरून आलं.

Conclusion:यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील,मेजर शंकरराव खांडेकर,कॅप्टन उमाकांत कुलकर्णी, पोलीस अधिकारी महावीर सकाळी,अरुण पवार, राजेंद्र बहिरट,जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयतील अनिल कुमार मेगंशेट्टी,कॅप्टन मार्तंड दाभाडे, सुभेदार मेजर संजीव काशीद, समीर आरकाटे,राजसाहेब शेख,चंद्रकांत साळुंके,दीनेश नागणे, गुरुनाथ कुलकर्णी,श्रीमती आशादेवी तावडे तसेच पोलीस कर्मचारी व NCC विद्यार्थी आणि सैनिकी वस्तीगृहातील मुलं-मुली मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.