सोलापूर - करमाळा शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवरील लोखंडी स्लॅब कोसळल्याने 15 जण जखमी झाले आहेत. तर यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. स्लॅब कोसळला त्यावेळी बँकेत अनेक ग्राहक होते. आज (बुधवार) सकाळच्या दरम्यान अनेक खातेदार हे बँकेत आलेले होते. त्यामुळे बँकेत काहीशी गर्दी होती. त्याचवेळी अचानक पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला. त्यामुळे जवळजवळ ३० हून अधिक जण हे ढिगाऱ्याखाली अडकले होते. यातील सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
या दुर्घटनेत प्रशांत कैलास बागल (भोसरे, ता.माढा. कर्मचारी, प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय) यांचा मृत्यू झाला. तसेच त्यानंतर रात्री उशीरा लोचना गुंजाळ (75 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत.
प्रशांत बागल हे बँकेच्या कामासाठी करमाळ्याला आले होते. यावेळी बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास अचानकपणे पहिल्या मजल्यावरील लोखंडी अँगल व फरशीचा स्लॅब कोसळला.
- उपचारासाठी सोलापूरला पाठवलेले जखमी
- सुरज पवार
- अनिल वारे
- चंद्रकांत पवार
- लैला पवार
- सुनील काळे
- मंगल गरड
- नंदाबाई पवार
- सुभद्रा लकडे
- राजेंद्र भोसले
करमाळ्यातील जखमी
- नारायण भोसले
- मंगल गरड
- नवनाथ देमुंडे
- अमितकुमार साहेब
- महादेव मोरे
- आबा जाधव
बँक कर्मचारी सुखरूप -
बँकेचे कर्मचारी ज्या ठिकाणी बसतात त्याभागाला कोणतीही ईजा झालेली नाही. बँकेत आलेल्या ग्राहकांना बसण्यासाठी जी जागा असते त्या बाजूने स्लॅब कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली फक्त ग्राहकच अडकले होते. यामध्ये कर्मचाऱ्यांना कोणतीही ईजा झालेली नसून बँकेचे सर्व कर्मचारी सुखरूप आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना करमाळ्यातील कुटीर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवण्यात आले आहे.