पुणे : देशात लवकरच 5 जी सेवा सुरू होणार आहे. देशात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहे. तसेच राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली जात आहे. पुणे जिल्हा हा तर सर्व बाबतीत सर्व गुण संपन्न असा समजला जातो. पुण्यातील ग्रामीण भागही तसा विकासलेला आहे. मात्र सत्य परिस्थिती वेगळीच असल्याचे आजच्या या घटनेतून समोर आले आहे.
ग्रामीण भाग अद्यापही मागासलेलाच मावळ तालुक्यात आंदर मावळात चक्क एका महिलेला झोळी करून उपचारासाठी नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यांवर जाण्यासाठी रस्त्यांची वानवा असल्याचे समोर आले आहे. आंदर मावळ येथील सटवाईवाडी येथे राहणारी ही महिला असून कामशेत येथील रुग्णालयात Hospital at Kamshet तिला झोळी मधून आणण्यात आले आहे. 6 ते 7 किमीचा प्रवास करून या महिलेला कामशेत येथील रुग्णालयात नातेवाइकांनी दाखल केले आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग अद्यापही मागासलेलाच असल्याचे लक्षात येते.
विदारक परिस्थिती येथील नागरिकांची पुणे जिल्ह्यातल्या Pune District आदिवासी भागात अद्यापही मूलभूत गरजा मिळत नसून या नागरिकांना आदवातेनेच प्रवास करावा लागत आहे. अनेक आदिवासी नागरिक मावळच्या आदिवासी भागात राहतात. त्यांना आरोग्याच्या सुविधा देखील उपलब्ध नाहीत. शिवाय त्यांच्या वस्तीपर्यंत पोहोचेल असा रस्ताही उपलब्ध नाही. तसेच अनेक आदिवासी नागरिक डोंगर वाटेने आपला उदरनिर्वाह करणेसाठी शहराच्या ठिकाणी येऊन रानमेवा घेऊन विक्रीसाठी येतात. मात्र रात्री आणि अडचणीच्या काळात कुठलीही अत्यावश्यक सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती आजारी पडली, तर त्या भागात किंवा त्या ठिकाणी जाण्यासाठी रुग्णवाहिका जाण्यासाठी रस्ता देखील नाही, अशी विदारक परिस्थिती येथील नागरिकांची आहे. मात्र आज एका महिलेला वेळेत उपचार मिळावे, म्हणून चक्क झोलीतून डोंगरवाटेने दवाखान्यात आणण्यात आले आहे.