ETV Bharat / city

सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन

सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात निधन झाले आहे. त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे या दोन्ही क्षेत्रांना जोडणारा दुवा निखळला आहे, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी श्रद्धांजली वाहिली.

Well known director Sumitra Bhave passed away
सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन
author img

By

Published : Apr 19, 2021, 9:50 AM IST

Updated : Apr 19, 2021, 1:39 PM IST

पुणे - सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात निधन झाले आहे. त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या 'कासव' चित्रपटाने ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा 'सुवर्ण कमळ' पुरस्कार जिंकला होता. त्यांच्या निधनामुळे या दोन्ही क्षेत्रांना जोडणारा दुवा निखळला आहे, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी श्रद्धांजली वाहिली.

सुमित्रा भावे या मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक होत्या. त्यांनी एकूण सुमारे १४ चित्रपट, ५०हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिकांचे लिखाण केले होते. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून पदवी घेतल्यावर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन विषयात एम.ए. केले. शिवाय त्यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची ग्रामविकास विषयाची पदविका मिळविली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले होते.

पुण्याच्या कर्वे विद्यापीठाच्या समाजसेवा संस्थेत दहा वर्षे प्राध्यापक आणि त्यानंतर सरकारप्रणीत कम्युनिटी अँड स्पॉन्सरशिपच्या त्या कार्यक्रम व्यवस्थापिका होत्या. सुमित्रा भावे यांच्या अनेक समाजकल्याणविषयक शोधपत्रिका प्रकाशित झाल्या आहेत. आकाशवाणीवर वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले आहे.

झोपडपट्टीतल्या महिलांचं आयुष्य दाखवणारा, १९८५ सालचा 'बाई' हा सुमित्रा यांचा पहिला लघुपट होता. हा त्यांच्या 'स्त्रीवाणी' या शोधप्रकल्पाचा भाग होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यांचा पुढचा लघुपट 'पाणी' यालाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

या चित्रपटांचे दिग्दर्शन..

'दिठी', 'दहावी फ', 'अस्तु', 'एक कप च्या', 'कासव', 'घो मला असला हवा', 'जिंदगी जिंदाबाद (हिंदी)', 'देवराई', 'दोघी', 'नितळ', 'फिर जिंदगी' (हिंदी लघुपट), 'बाधा', 'बेवक्त बारिश' (हिंदी लघुपट). 'मोर देखने जंगल में' (हिंदी माहितीवजा कथापट), 'वास्तुपुरुष', 'संहिता', 'हा भारत माझा' या निवडक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रध्दांजली
मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रध्दांजली

मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रध्दांजली...

समाजातील संवेदनशील विषयावर भाष्य करण्यासाठी भावे यांनी चित्रपट या माध्यमाच्या ताकदीचा पुरेपूर वापर केला. आपल्या दिग्दर्शन कौशल्याने त्यांनी सामाजिक प्रश्नांची जाणीव करून देणारा आरसाच समाजासमोर धरला. मनोरंजन क्षेत्राचा हा पैलू उलगडून दाखवून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला वेगळी वाटही घालून दिली. उत्तम चित्रपट निर्मिती बरोबरच त्यांनी समाजप्रबोधनातही मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे या दोन्ही क्षेत्रांना जोडणारा दुवा निखळला आहे. मात्र सामाजिक कार्यकर्ती आणि संवेदनशील दिग्दर्शिका म्हणून केलेले काम या दोन्ही क्षेत्रासाठी यापुढेही मार्गदर्शक ठरेल, मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा : कोरोनाच्या काळात इतर राज्यांमध्ये प्रवास करणार आहात...जाणून घ्या नियम

Last Updated : Apr 19, 2021, 1:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.