ETV Bharat / city

मुख्य मंदिरामध्येच होणार 'दगडूशेठ'चा गणेशोत्सव; वाचा यंदाचे वैशिष्टये

author img

By

Published : Sep 2, 2021, 8:07 PM IST

सलग दुसऱया वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजहित व भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे.

shrimant dagdusheth halwai ganpati
श्रीमंत दगडूशेठ

पुणे - सलग दुसऱया वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजहित व भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. ट्रस्टच्या १२९ वर्षात सलग दुसऱया वर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे उत्सवाची परंपरा खंडित होत आहे.

मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर व ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार आहे. ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन भक्तांना घरबसल्या मंदिराच्या गाभाऱयात बाप्पाची आरती करण्याचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून घेता येणार आहे, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सहपोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने, डॉ.रामचंद्र परांजपे, माणिक चव्हाण, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षी मंदिरामध्येच उत्सवात गणपती विराजमान होणार आहे. मंदिराच्या परिसरात पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील असणार आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही.

  • यंदाचे वैशिष्टय -
  • ऑगमेंटेंड रिअ‍ॅलिटी तंत्रज्ञानाचा वापर -

ऑगमेंटेंड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानाचा वापर हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख वैशिष्टय असणार आहे. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार जास्तीत जास्त भक्तांनी ऑनलाईन दर्शन घ्यावे, याकरीता या तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. याकरीता ट्रस्टतर्फे एक लिंक देण्यात येणार असून त्या लिंकवर जाऊन घरी भक्ताने आरती करतानाचा व्हिडिओ काढल्यास प्रत्यक्ष दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱयात श्रीं ची आरती करतानाचा व्हिडिओ तयार होणार आहे. आपण गाभा-यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करत असल्याचा आनंद व्हिडिओ पाहून भक्तांना घेता येईल.

हेही वाचा - हितचिंतकांनीच मी भ्रष्टाचारी असल्याची प्रतिमा जनमाणसात उभी केली; एकनाथ खडसेंचा वाढदिवशी विरोधकांवर निशाणा

  • विश्वस्त आणि कार्यकर्ते मंदिरात जाणार नाहीत -

शासनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे मंदिर बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश मिळत नाही. उत्सवाच्या काळात ट्रस्टचे विश्वस्त आणि कार्यकर्ते देखील मंदिरात जाणार नसल्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. दैनंदिन धार्मिक विधी केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. भाविकांसाठी मंदिर परिसरात दोन मोठ्या एलईडी स्क्रिन लावण्यात येणार असून त्याद्वारे श्रीं चे दर्शन घेता येईल. तसेच मंदिरासमोर दोन्ही बाजूला रेलिंगची सोय करण्यात येईल. यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी या स्थानाचे महत्व अबाधित रहावे, याकरीता तेथे देखील एका एलईडी स्क्रिनची सोय करण्यात आली आहे.

  • मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई व दररोज २१ किलो मिष्टांनांचा भोग -

गणेशोत्सवात मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. तसेच दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईसह मिष्टांनांचा भोग श्रीं समोर लावण्यात येणार आहे. याशिवाय श्रींना दररोज वेगवेगळे महाउपरणे देखील घालण्यात येणार आहे. यावर गणेशांची विविध नावे साकारण्यात आली आहेत. अष्टविनायकांची मयुरेश्वर, सिद्धीविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरीजात्मज, विघ्नेश्वर, महागणपती ही ८ नावे, दगडूशेठ आणि गणाधिश अशी १० उपरणी तयार करण्यात आली आहे. दररोज एक उपरणे श्रीं ना घालण्यात येईल. मंदिरामध्ये व परिसरात कायमस्वरुपी असलेल्या ६० सीसीटिव्ही कॅमे-यांचा वॉच देखील राहणार आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना ट्रस्टतर्फे केल्या जाणार आहेत.

हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, दोन महिन्यांपासून रखडलेले वेतन मिळणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.