ETV Bharat / city

Terror Of Gang In Pune : पुण्यात कुख्यात गुंड अमीर खानला मारण्यासाठी गेलेल्या टोळक्याची दहशत

कोयते, तलवारी घेऊन पुण्यातील एका वस्तीत घुसत गाड्या फोडून दहशत माजविणाऱ्या टोळीला ( Terror Of Gang In Pune ) बिबवेवाडी पोलिसांनी जेरबंद ( Bibavewadi Police Arrested Accuse ) केले आहे. वस्तीत घुसून टोळक्याने मोठी दहशत माजवली होती. जीवाच्या आकांताने लोकं घराचे दरवाजे बंद करून बसले होते.

आरोपी गजाआड
आरोपी गजाआड
author img

By

Published : Dec 18, 2021, 11:30 AM IST

Updated : Dec 20, 2021, 2:40 PM IST

पुणे - पुण्यातील बिबवेवाडीत असलेल्या शेळकेवस्तीत घुसून तलवार आणि कोयत्याची भीती दाखवत नागरिकांमध्ये दहशत ( Terror Of Gang In Pune ) पसरविणाऱ्या ७ जणांच्या टोळीला बिबवेवाडी पोलिसांनी जेरबंद केले ( Bibavewadi Police Arrested Accuse ) आहे. आरोपींचे कोंढवा खुर्द येथील काकडेवस्तीत राहत असलेल्या अमीर खान (Pune Amir Khan ) व त्याच्या साथीदारांशी वाद होते. त्यावरून आरोपींनी शेळकेवस्ती येथे जात दहशत माजवली.

पुण्यात अमीर खानला मारण्यासाठी गेलेल्या टोळक्याची दहशत, खुनाचा प्रयत्न करून वाहनांची तोडफोड, १२ तासांत आरोपी गजाआड

वाढदिवस साजरा करत असतानाच हल्ला

काकडेवस्ती, कोंढवा खुर्द येथील अमीर खान व त्याचे साथीदार तसेच शेळकेवस्ती, बिबवेवाडी येथील सुरज कोळी, आकाश कोळी व त्यांचे त्यांच्या साथीदारांमध्ये पूर्ववैमनस्यावरून वाद सुरु होते. या वादातूनच अमीर खान हा त्याच्या घरी वाढदिवस साजरा करत असताना शेळके वस्तीतील सुरज कोळी व त्याचे साथीदार हे अमीर खानला मारण्यासाठी ( Attack while celebrating Birthday ) गेले. यावेळी अमीर खान व त्याचे मित्र तेथून पळून गेले. परंतु सूरज कोळी व त्याच्या टोळीला घरे माहित नसल्याने त्यांनी शेळके वस्ती येथे रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या २ ऑटो रिक्षा, ४ पॅगो व एका अशोक लेलैंड टेम्पोच्या काचा कोयत्याने व तलवारीने फोडल्या. तसेच १ मोटार सायकल व एका अॅक्टिवा मोपेडच्या पेट्रोल टाकीवर कोयते व तलवारीने मारून मोठमोठ्याने आरडाओरडा करत दहशत माजवली. त्यामुळे तेथील लोकं सैरावैरा पळू लागले.

मानेवर, डोक्यावर कोयत्याने वार

वस्तीतील लोकांच्या मागे कोयते व तलवारी घेवून चालत जावून जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. लोकांनी आपल्या घराचे दरवाजे बंद केले असता, त्यावर लाथा मारल्या. त्यावेळी कानिफनाथ रणदिवे व लक्ष्मण दौडमणी यांच्या मानेवर व डोक्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार ( Hit On Neck Head With Scythe ) केला. सदरचा वार चुकवून ते जीवाच्या आकांताने घरामध्ये पळून गेले. याबाबत रणदिवे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांचा थरारक पाठलाग

घटना अतिशय गंभीर असल्यामुळे पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवून, अतिशय थरारकपणे पाठलाग करून अवघ्या 12 तासांमध्ये टोळीतील सर्व सदस्यांना जेरबंद केले. टोळी सदस्य रोहित नरसिंग राठोड (वय १८ वर्ष), अरबाज अहमद पटेल (वय १९ वर्षे), सुरेंद्र गोपाल लाबीछने (वय १९ वर्षे.), रोहन राजेंद्र जगताप (वय २२ वर्षे, सर्व रा. काकडे वस्ती, कोंढवा खुर्द), सोनु अनिल खंदारे (वय २५ वर्षे, रा. राजीव गांधी नगर), अर्जुन ऊर्फ शैलेश अमोघसिद माळू (वय २२ वर्षे, रा. टिळेकरनगर) व एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. आरोपींकडून लोखंडी कोयते व तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहेत.

या पथकाने केली धडाकेबाज कारवाई

बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होताच बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या सुचनांप्रमाणे बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे प्रभारी अधिकारी प्रविण काळुखे यांनी सहायक उपनिरीक्षक दिपक मते, पोलीस हवालदार शाम लोडोमकर, पोलीस शिपाई अमित पुजारी, अतुल महागडे, श्रीकांत कुलकर्णी, तानाजी सागर, शिवा येवले यांच्यासह आरोपींचा शोध घेतला. पोलीस शिपाई अमित पुजारी, अतुल महांगडे, तानाजी सागर, शिवा येवले यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

Last Updated : Dec 20, 2021, 2:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.