पुणे - राजस्थानमधील कोटा येथे लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यात आले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील 74 विद्यार्थ्यांना देखील कोटा येथून शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात आणण्यात आले.
हेही वाचा.... कोरोनाविरुद्ध लढतायेत हे 'मराठी योद्धे', देशभर होतंय कौतुक
राजस्थानातून या विद्यार्थ्यांना रेल्वे तसेच एसटी महामंडळाच्या बसच्या माध्यमातून पुण्यात आणण्यात आले. चार बसमधून एकूण 74 विद्यार्थ्याना पुण्यात आणण्यात आले. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात मध्यरात्री हे विद्यार्थी पोहचले. एकूण 74 विद्यार्थी आणि 08 ड्रायव्हर यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये कोणीही COVID-19 (कोरोना संक्रमित) अथवा संबंधित लक्षणे असल्याचे किंवा आजारी नसल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मनगटावर होम क्वारंटाईनचा चा शिक्का मारून त्यांना घरी पाठवण्यात आले.