पुणे - जिल्ह्यातील जुन्नर-बनकर फाटा रस्त्यावर कुमशेत फाटा येथे टेम्पोतून पडल्याने एका १२ वर्षीय शिवभक्ताचा मृत्यू झाला. प्रतिक उमेश शिंगोटे(रा. खामुंडी, ता.जुन्नर) असे मृत पावलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.
हेही वाचा... धक्कादायक ! पतीचा अंत्यविधी होताच पत्नीचीही गळफास घेऊन आत्महत्या
जुन्नर तालुक्यातील खामुंडी भागातील काही युवक शिवजयंती निमित्ताने शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर गेले होते. तेथुन शिवज्योत घेऊन परत येत असताना जुन्नर-बनकर फाटा रस्त्यावर कुमशेत फाटा येथे पिकअप टेम्पोतून प्रतिक खाली पडला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या बरोबर असणाऱ्या शिवप्रेमींनी ओतूर येथील एका खासगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी नेले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा... उन्नाव प्रकरण: माजी आमदार कुलदिप सिंह सेनगरच्या शिक्षेवर आज निकाल
त्या दुर्घटनेची पुनरावृत्ती...
तारखेप्रमाणे १९ फेबुवारी रोजी शिवजयंतीसाठी किल्ले हडसर येथे काही शिवभक्त गेले होते. मात्र, किल्ल्याच्या कड्यावरून पडून एका २० वर्षीय युवतीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या चिमुकल्या शिवभक्ताच्या मृत्यूनंतरही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.