पुणे : शिंदे फडवणीस सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल, तसेच पुढील सरकार पण भाजप- शिवसेना शिंदे यांचेच असणार,असा विश्वास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुण्यात व्यक्त ( union state minister Ravsaheb danve ) केला आहे. विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी शिंदे यांच्या गटातील काही आमदार नाराज आहेत. त्यामुळे ती किती वेळ सरकार टिकेल, हे माहीत नाही अशी टीका केली होती. त्यावर रावसाहेब दानवे बोलत होते.
आम्ही आमचे काम करत राहणार - अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या विरोधात आक्षेप घेतलेला आहे. त्यावर बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, आक्षेप घेणे हे त्यांचे काम आहे आणि विरोधी पक्ष म्हणून ते घेतच राहणार. पण आम्ही आमचे काम करत राहू. त्यांनी आक्षेप घेत राहावेत, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. पुण्यातील बालेवाडी भागामध्ये आज दिवाळी सर्जा वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केलेले होते. हा कार्यक्रम केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते तसेच चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी रावसाहेब दानवे बोलत होते.
न्यायालयात जाणार - ठाकरे गटातील पदाधिकारी तथा मुंबई पालिकेचे माजी नगरसेवक संदीप नाईक यांनी मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. पटेल यांनी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची माहिती शपथपत्रात दिली नाही, असा आरोप नाईक यांनी केला आहे. तसेच त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणी संदीप नाईक यांनी केली आहे. या मागणीला घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असा अशी माहितीही त्यांनी दिली आहे.