पुणे - महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आता पुण्यात येणाऱ्या भाज्यांची आवक कमी प्रमाणात होत आहे. पुण्यातील मार्केट यार्ड भाज्यांच्या गाड्या आज ( 27 जुलै ) कमी होत्या. त्याचा फटका ग्राहकांना बसत असून, दरांमध्ये 80 ते 120 रुपयांपर्यत वाढ झाली ( Pune Vegetable Price rising in 15 to 29 percent ) आहे.
पुण्यामधील डेक्कन भागाच्या भाजी मार्केटमध्ये आज भाज्याचे भाव साधारण 120 ते ८० रुपये किलो होते. मुख्य मार्केट यार्डमध्ये भाज्यांची आवक कमी होत्या. त्यामुळे मार्केटमध्येच भाज्यांचे दर महाग होत असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली आहे.
हेही वाचा - Prithviraj Chavan : 'शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवून हिंदुत्ववादी मतं...'; पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान