ETV Bharat / city

Murlidhar Mohol on corona - पुण्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात; शहरातील जम्बो रुग्णालय 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवीन प्रकार हा अत्यंत संसर्गजन्य आणि चिंता वाढवणारा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले. पुणे शहरातील जम्बो रुग्णालय ( Murlidhar Mohol inform on Jumbo Hospital in pune ) पुढील काही दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ( pune Mayor Murlidhar Mohol ) यांनी दिली.

Murlidhar Mohol inform on Jumbo Hospital in pune
पुणे कोरोना मुरलीधर मोहोळ प्रतिक्रिया
author img

By

Published : Nov 28, 2021, 5:42 PM IST

पुणे - दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवीन प्रकार हा अत्यंत संसर्गजन्य आणि चिंता वाढवणारा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले. त्यानंतर देशासह राज्यात देखील खबरदारी घेतली जात आहे. राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. तसेच, पुणे शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला तर शहरात कोरोना नियंत्रणात असून जर दुर्दैवाने नवीन विषाणूमुळे शहरातील परिस्थिती दुसऱ्या लाटेप्रमाणे झाली तर, पुन्हा सर्व स्ट्रक्चर उभे करण्याची वेळ येऊ नये म्हणून शहरातील जम्बो रुग्णालय ( Murlidhar Mohol inform on Jumbo Hospital in pune ) पुढील काही दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ( pune Mayor Murlidhar Mohol ) यांनी दिली.

माहिती देताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ

हेही वाचा - Chandrakant Patil Allegations : महाविकास आघाडी सरकारने 2 वर्षात फक्त पैसे कमवण्याचे काम केले - चंद्रकांत पाटील

शहरात दररोज 100 च्या आत अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरात दुसरी लाट ओसरल्यानंतर शहरात दररोज 100 च्या आत अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आढळून येत आहे. शहरात आज एकूण 845 कोरोना रुग्ण हे उपचार घेत आहेत. तर, 97 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे शहरात आत्तापर्यंत 5 लाख 6 हजार 473 पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झाली आहे तर, आजपर्यंत 4 लाख 96 हजार 525 रुग्णांना डिस्चार्ज मिळाले आहे.

जम्बो रुग्णालय पुढील काही दिवस सुरूच राहणार

पुणे शहरात सध्याची कोरोना परिस्थिती ही नियंत्रणात आहे. परंतु, जगात नवीन व्हेरियंटची चर्चा सुरू आहे आणि त्याबाबत देशपातळीवर विचार देखील सुरू आहे. काळजी घेतली पाहिजे आणि त्याचमुळे पुण्यातील जम्बो रुग्णालय आहे त्याच परिस्थितीत पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. शहरातील रुग्णसंख्या जरी आटोक्यात आली असली तरी नवीन विषाणूचा विचार करता जम्बो रुग्णालय ( Jumbo Hospital in pune ) पुढील काही दिवस अशाच पद्धतीने सुरू राहणार, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

हेही वाचा - फुलेवाडा अन् सवित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाला गती द्या - उपमुख्यमंत्री अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.