ETV Bharat / city

Disabled Exhibition : प्रदर्शनाद्वारे दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना चालना; अपंग व्यक्तींसाठी प्रोत्साहन प्रदर्शनाचे आयोजन

दिवाळीसाठी ( Diwali festival ) खास पणत्या, भेटकार्ड, फुलांचे तोरण... मण्यांचे, कागदाचे, कापडाचे, काचेचे रंगीबेरंगी आकाशकंदील इत्यादी वस्तू दिव्यांगांनी ( Various items sown by the disabled ) साकारल्या आहेत.

author img

By

Published : Oct 15, 2022, 8:54 PM IST

Special gifts for Diwali
दिवाळीसाठी खास पणत्या

पुणे : दिवाळीसाठी ( Diwali festival ) खास पणत्या, भेटकार्ड, फुलांचे तोरण... मण्यांचे, कागदाचे, कापडाचे, काचेचे रंगीबेरंगी आकाशकंदील इत्यादी वस्तू दिव्यांगांनी ( Various items sown by the disabled ) साकारल्या आहेत. शारिरीक व्यंगावर मात करीत दिव्यांग, दृष्टीहिन, विशेष व्यक्तींनी साकारलेल्या वस्तूंचे प्रोत्साहन प्रदर्शन पुण्यामध्ये सुरू झाले. प्रदर्शनात इलेक्ट्रीक वस्तू, मण्यांचे दागिने, पिशव्या तयार करण्यासोबतच भाजी चिरणे, पोळ्या लाटण्याचे प्रात्यक्षिक सादर करीत दृष्टीहिन व्यक्तींनी उपस्थितांना थक्क केले.

प्रदर्शनाद्वारे दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना चालना

दिव्यांग व्यक्तींसाठी प्रोत्साहन प्रदर्शन - कर्वे रस्त्याजवळील अश्वमेध हॉल येथे पुण्यातील एका समविचारी मैत्रिणींच्या गटाने दिव्यांग व्यक्तींसाठी प्रोत्साहन प्रदर्शन २०२२ चे आयोजन केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कीर्तीची विशेष जलतरणपटू गौरी गाडगीळ हिच्या हस्ते झाले. यावेळी आयोजिका रेखा कानिटकर, रंजना आठल्ये, आरती पटवर्धन, माधुरी पाटणकर, शुभदा करंदीकर, गीता पटवर्धन, आबिदा खान, नीलम भाटवडेकर, अमृता पटवर्धन, रोहिणी अभ्यंकर उपस्थित होत्या. उपक्रमाचे १९ वे वर्ष आहे.

Handicapped while making things
वस्तू बनवतांना दिव्यांग

कलागुणांचे सादरीकरण प्रदर्शनाचे वैशिष्ट्य - आम्ही समविचारी मैत्रिणींनी एकत्र येऊन २००३ पासून हा उपक्रम हाती घेतला आहे. सुरुवातीला केवळ १० संस्था आणि १० दिव्यांग व्यक्तींनी प्रदर्शनात सहभाग घेतला. परंतु अनेक लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली, त्यामुळे पहिल्याच वर्षी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. दिव्यांगांना अनेक चांगल्या गोष्टी करता येतात. परंतु त्यातून अर्थाजन कसे करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यांची ही गरज ओळखून त्यांना मदत करण्याचे ठरविले आणि या प्रदर्शनाचे आयोजन केले. अस यावेळी आयोजक रेखा कानिटकर म्हणाल्या. रंजना आठल्ये म्हणाल्या, फक्त दिव्यांग व्यक्तिंचाच सहभाग असलेल्या या प्रदर्शनात त्यांच्या उपयुक्त कलात्मक वस्तू आणि खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन व विक्री केली जाते. तसेच त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. दिव्यांग व्यक्ती, त्यांच्यासाठी काम करणा-या संस्था आणि सामान्य नागरिक यांच्यात परस्पर संवाद व सहकार्य स्थापन करणे, हा या मागचा उद्देश आहे.

Various items sown by the disabled
दिव्यांगांनी बववलेल्या विविध वस्तू
Diwali festival
प्रदर्शनात विविद वस्तू

दिव्यांगांचे २५ वैयक्तिक स्टॉल्स - यंदा प्रदर्शनात १० संस्था आणि १८ ते ८० वयोगटातील दिव्यांगांचे २५ वैयक्तिक स्टॉल्स आहेत. शिर्डी साईबाबा अंध वृध्द महिलाश्रम, संवाद - लोणावळा, नंदनवन, स्मित फाउंडेशन, आयडियल इनोव्हेटिव्ह ट्रस्ट(अंध) इत्यादी संस्था सहभागी झाल्या आहेत.साई गुरू संस्थेतील दृष्टिहीन मुली विविध वस्तू तयार करण्याचे तसेच शिर्डी साईबाबा अंध वृध्द महिला वायरचे बास्केट, मण्यांचे शोपीस तयार करण्याचे प्रत्याक्षिक केले जात आहे. दिव्यांगाना सक्षम करणे हाच प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.